कोरोनाची साथ रोखण्यासाठी भारताकडून म्यानमारला सहाय्याचे आश्वासन

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळात भारत म्यानमारला सर्वोतोपरी सहाय्य करील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारला दिले.

म्यानमारच्या स्टेट ऑन कौन्सिलर ‘आँग सँन स्यू की’ यांच्याशी केलेल्या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी म्यानमारला हे आश्वासन दिले. ‘नेबरहुड फर्स्ट’ अर्थात शेजारी देशांना प्राधान्य हे भारताचे धोरण असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. स्यू की यांच्याबरोबर पार पडलेल्या चर्चेच्या एक दिवस आधी पंतप्रधानांची बांगलादेशच्या पंतप्रधानांसोबत चर्चा पार पडली होती.

म्यानमारमध्ये कोरोनाव्हायरसने सहा जणांचा बळी घेतला आहे. तर या साथीची लागण झालेल्यांची संख्या १५१वर गेली आहे. या साथीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्यामुळे म्यानमारच्या आरोग्य यंत्रणेसमोरचे आव्हान वाढले आहे. अशावेळी भारताने म्यानमारसमोर मदतीचा हात पुढे केला आहे. शेजारी देशाला सर्वाधिक प्राधान्य या धोरणानुसार भारत म्यानमारला सर्वोतोपरी सहाय्य करायला सज्ज आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. भारत आणि म्यानमारच्या नेत्यांमध्ये कोरोनाव्हायरस आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा पार पडली. तसेच एकत्रितरीत्या या साथीच्या विरोधात लढा देण्यावर उभय नेत्यांचे एकमत झाले

leave a reply