संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये

- पाकिस्तानातून होणाऱ्या शस्त्रतस्करीवर भारताची जोरदार टीका

संयुक्त राष्ट्रसंघ – ‘भारत सीमेपलीकडून ड्रोनद्वारे होणाऱ्या शस्त्रतस्करीचा सामना करीत आहे. कोणत्याही सरकारचे पाठबळ असल्याखेरीज अशा प्रकारची बेकायदा शस्त्र तस्करी शक्य नाही. हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असून यामुळे भूराजकीय तणाव वाढू शकतो’, अशा शब्दात भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला. तसेच काही देश बेकायदा शस्त्र तस्करी करीत आहेत आणि दहशतवाद्यांना पोसत आहेत, त्यांना जबाबदार धरले जावे, अशी मागणी करीत ‘आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोका’ या विषयावर आयोजित चर्चेत कंबोज यांनी पाकिस्तानची कोंडी केली.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये - पाकिस्तानातून होणाऱ्या शस्त्रतस्करीवर भारताची जोरदार टीकाशस्त्र आणि लष्करी साहित्याची बेकायदा निर्यात आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन ठरते. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भारत याचा सामना करीत आहे. ड्रोनद्वारे सीमेपलीकडून तस्करी सुरू आहे. अवैध शस्त्राच्या तस्करीला जेव्हा काही देशांच्या सरकारांचे पाठबळ असते, त्यावेळी यासंदर्भातील धोक्याची व्याप्ती वाढते, असे भारताच्या प्रतिनिधी कंबोज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या लक्षात आणून दिले.

अवैध शस्त्र निर्यातीचे नेटवर्क या देशांनी तयार केले आहे. संवेदनशील तंत्रज्ञानही अशा देशांकडून पुरविले जाते. दहशतवाद्यांबरोबर या देशांचे संधान असते. आंतरराष्ट्रीय समुदायाने अशा देशांचा, प्रवृत्तींचा निषेध करायला हवा आणि या देशांना जबाबदार ठरवून त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी कंबोज यांनी केली.

हिंदी English

 

leave a reply