कोरोनाच्या साथीनंतर भारताची अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने पूर्वपदावर आली

वॉशिंग्टन – 2021 सालच्या मध्यावर आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम केला होता. मात्र त्यानंतरच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने झेप घेतली. कोरोनाच्या साथीनंतर भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने पूर्वपदावर आली, असा दावा अमेरिकेच्या कोषागार विभागाने आपल्या अहवालात केला आहे. अमेरिकन संसदेसाठी तयार करण्यात आलेल्या या अर्धवार्षिक अहवालात, भारताने कोरोनाच्या लसीकरणाच्या मोहिमेचेही कौतूक केले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा भारतावर तितकासा परिणाम झाला नव्हता. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाच्या भयावह परिणामांपासून दूर राहिला होता. मात्र 2021 सालच्या मध्यावर आलेल्या कोरोनाच्या साथीचा भयंकर फटका भारताला बसला. याचा विघातक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला. असे असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेची ही घसरण फार काळ राहिली नाही. जबरदस्त वेगाने भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली, याची नोंद सदर अहवालात करण्यात आली आहे.

2022 सालाच्या सुरूवातीला कोरोनच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचा शिरकाव भारतात झाला होता. पण त्याचा विशेष परिणाम भारतावरझाला नाही. त्याचा मृत्यूदर व आर्थिक परिणाम अतिशय मर्यादित होते, असे सांगून सदर अहवालात भारताची प्रशंसा करण्यात आलीआहे. भारताच्या सरकारने या साथीच्या काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सहाय्य पुरविण्याचे धोरण स्वीकारले होते, याकडेही सदर अहवालात लक्ष वेधण्यात आले. या काळात भारताच्या रिझर्व्ह बँकेने आपल्या व्याजदरात बदल केले नव्हते, याचीही नोंद सदर अहवालात करण्यात आली आहे.

याबरोबरच 2021 सालाच्या अखेरपर्यंत भारताच्या जनसंख्येपैकी 44 टक्के इतक्या प्रमाणात कोरोनाचे लसीकरण झाले हेोते, असे सांगून या लसीकरणाच्या धडाक्याचेही अमेरिकेच्या कोषागार विभागाने आपल्या अहवालात कौतूक केले आहे.

leave a reply