कोरोनाव्हायरस – भारतीयांनी ५३ हजार कोटी रुपये बँकांमधून काढले 

कोरोनाव्हायरस – भारतीयांनी ५३ हजार कोटी रुपये बँकांमधून काढले 

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या भीतीने भारतीयांनी बँकांमधून मोठ्याप्रमाणात पैसे काढला आहे. १३ मार्चपर्यंत देशवासियांनी बँकेतून ५३,००० कोटी रुपये काढल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली.

देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यानंतर परदेशाप्रमाणे देशातही लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण होऊ शकते, असे अंदाज बांधले जाऊ लागले. अशा परिस्थितीत बँकेतून पैसे काढण्यात अडचणी येतील या भीतीने नागरिकांनी मोठ्या रकमा बँकातून काढल्या. १३ मार्चपर्यंत ग्राहकांनी बँकेतून तब्बल ५३,००० कोटी रुपये काढले. इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम साधारण सण आणि निवडणुकी काळात काढल्या जातात.  खातेदारांनी बँकातून  काढलेले हे पैसे  गेल्या १६ महिन्यातला हा उच्चांक असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, जनतेने घाबरुन जाऊ नये. सरकारी आणि खाजगी बँकेतले पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही आरबीआयने दिली आहे. तसेच कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे आरबीआयने भारतीयांना  डिजिटल व्यवहार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

leave a reply