साथीपासुन वाचण्यासाठी केलेल्या मद्यपानाचे इराणमध्ये २७९ बळी

साथीपासुन वाचण्यासाठी केलेल्या मद्यपानाचे  इराणमध्ये २७९ बळी

तेहरान, दि. २८ (वृत्तसंस्था ) – मद्यपान करुन स्वत:ला कोरोनाव्हायरसपासुन सुरक्षित ठेवता येईल, या गैरसमजातून विषारी दारू प्यायल्याने इराणमध्ये २७९ जणांचा बळी गेला आहे. कोरोनाव्हायरसबरोबरच या गैरसमजूती व अफवा यांचा सामना करणे इराणसाठी अवघड बनत चालले आहे.

या साथीने २३७८ बळी घेतले असून याचे ३२ हजारांहून अधिक रूग्ण इराणमध्ये आहेत. अत्याव्यस्थ असलेल्या रुग्णांची संख्या २८०० हून अधिक असल्याचे सांगितले  जाते. यामुळे इराणमध्ये मोठी घबराट पसरली असून व त्यापासून स्वतःला सुरक्षित राखण्यासाठी इराणची जनता अफवा व गैरसमजूतीच्या आहारी गेल्याचे दिसत आहे. यातूनच मद्यपान केल्याने या साथीपासून स्वतःला सुरक्षित राखता येते, या भ्रमामुळे २७९ जणांचा जीव गेला. हे सारे जण विषारी दारू प्यायले होते.

इराणमध्ये मद्यपानावर बंदी असून, काळ्याबाजारातून खरेदी केलेया विषारी दारुमुळे हा भयंकर प्रकार घडला. मात्र या दुर्घटनेमागे इराणच्या जनतेमध्ये कोरोनाव्हायरसची भीती कारणीभूत असल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे. त्यातच इराणची आरोग्य यंत्रणा ही साथ रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. यामुळे इराणी नागरिक इतर मार्गांचा अवलंब करुन आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. या दुर्घटनेमुळे ही बाब ठळकपणे समोर येत आहे.

leave a reply