भारताच्या ‘चांद्रयान-2’ला चंद्रावर जलरेणूंचे अस्तित्व सापडले

- इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार

‘चांद्रयान-2’नवी दिल्ली – 2019 सालात इस्रोने राबविलेल्या ‘चांद्रयान-2’ मोहिमेला आंशिक अपयश मिळाले होते. चंद्राच्या पृष्ठभागावर लॅण्डर आणि रोव्हर उतरविण्यात अपयश आले असले, तरी ऑर्र्बिटर व्यवस्थित काम करीत असून चंद्राबाबत नवनवी माहिती सातत्याने नियंत्रण कक्षाला पाठवित आहे. ‘चांद्रयान-2’ माहिमेमध्ये चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या सोडण्यात आलेल्या ऑर्बिटरने चंद्रावर पाण्याची उपस्थितीचे पुरावे दिले आहेत. चंद्रावर हायड्रॉक्सिल आणि पाण्याचे रेणूंचे अस्तित्व आढळले असल्याचे इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी एका संशोधक अहवालात म्हटले आहे.

‘चांद्रयान-2’ने चंद्रावर पाण्याची उपस्थिती शोधली आहे, असा दावा किरण कुमार यांनी याबाबत एक रिसर्च पेपरमध्ये तयार केला आहे. हा अहवाल करंट सायन्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. ऑर्बिटरमधील उपकरणांमध्ये ‘इमेजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर’ बसविण्यात आले आहे. याद्वारे चंद्राच्या ध्रुविय कक्षेतील महत्त्वाचा डाटा सातत्याने मिळत आहे. त्यामध्ये या जलरेणूंचे अस्तित्व सापडल्याने किरण कुमार यांनी अधोरेखित केले आहे. ‘इमेजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर’द्वारे जलरेणू अर्थात पाण्याचे रेणू (एचटूओ) आणि हायड्रॉक्सिल (ओएच) हे चंद्राच्या पृष्ठभागावर दिसून आले आहेत.

चंद्राच्या 29 डिग्री उत्तरेला आणि 62 डिग्री उत्तरेकडील अक्षांशावर जलरेणू आणि हायड्राक्सिसचे अस्तीव आढळले. चंद्रावरील मैदानी भागापेक्षा येथील प्लाजियोक्लेज समृद्ध खडकांमध्ये हायड्रॉक्सिल आणि पाण्याचे रेणू जास्त प्रमाणात आहेत, असा दावाही किरण कुमार यांनी केला आहे. भारताच्या चांद्रयानाकडून मिळालेली ही माहिती जागतिक संशोधकांना चंद्राबाबत जाणून घेण्यासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. चंद्रावरील हायड्रॉक्सिल आणि जलनिर्मिती व हायड्रेक्शन प्रक्रियेबद्दल यामुळे अधिक अभ्यास करता येईल. जलनिर्मितीच्या निरनिराळ्या स्रोतांवर प्रकाश पडेल, असे यावर संशोधकांनी म्हटले आहे.

सौर वारे चंद्राच्या पृष्ठभागावर आदळून जे अवकाशीय वातावरण तयार होते यातून होणारे बदल चंद्रावर हायड्रॉलिक्स तयार होण्यासाठी कारणीभूत असू शकतात, असा अंदाज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (आयआयआरएस), तसेच एसएसी व युआर आरो सॅटेलाईट सेंटर्स या संस्थांच्या संशोधकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, भारत चंद्राच्या दक्षिणेकडील अंधाऱ्या पृष्ठभागावर रोव्हर उतरविण्यास अपयश आल्यावर पुढील वर्षी चांद्रयान-3 मोहिमेची आखणी करीत आहे. याद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर पुन्हा एक रोव्हर उतरविण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वी ठरल्यास चंद्रावर अशी मोहिम आखणाऱ्या काही निवडक देशांमध्येभारताला स्थान मिळेल.

अर्थ ऑब्जर्वेशन उपग्रह-3 (इओएस-3) पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यासाठी आखण्यात आलेली मोहिम अपयशी ठरली आहे. गुरुवारी पावणे सहा वाजता जीएसएलव्ही एफ10 या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे इओएस-3 अवकाशात सोडण्यात आले. मात्र तिसऱ्या टप्प्यात ही मोहिम असताना क्रायोजिनिक इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही मोहिम यशस्वी झाली नसल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली.

या माहिमेत 2500 किलो वजनाचे इओएस-3 उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार होता. हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापन झाल्यावर अवघ्या चार तासात नियंत्रण कक्षाला पृथ्वीवरील छायाचित्र पाठविण्यास सुरुवात करणार होता. उपग्रहाद्वारे मॅपिंग व टेहळणी करणे शक्य होणार होते. त्यामुळे हा उपग्रह लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचा होता. केेंद्रीयमंत्री जितेंद्र सिंग यांनी आता ही मोहिम पुन्हा आखण्यात येईल, असे म्हटले आहे.

अर्थ ऑब्जर्वेशन उपग्रहाच्या मोहिमेला अपयश

‘चांद्रयान-2’अर्थ ऑब्जर्वेशन उपग्रह-3 (इओएस-3) पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यासाठी आखण्यात आलेली मोहिम अपयशी ठरली आहे. गुरुवारी पावणे सहा वाजता जीएसएलव्ही एफ10 या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे इओएस-3 अवकाशात सोडण्यात आले. मात्र तिसऱ्या टप्प्यात ही मोहिम असताना क्रायोजिनिक इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही मोहिम यशस्वी झाली नसल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली.

या माहिमेत 2500 किलो वजनाचे इओएस-3 उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार होता. हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापन झाल्यावर अवघ्या चार तासात नियंत्रण कक्षाला पृथ्वीवरील छायाचित्र पाठविण्यास सुरुवात करणार होता. उपग्रहाद्वारे मॅपिंग व टेहळणी करणे शक्य होणार होते. त्यामुळे हा उपग्रह लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचा होता. केेंद्रीयमंत्री जितेंद्र सिंग यांनी आता ही मोहिम पुन्हा आखण्यात येईल, असे म्हटले आहे.

leave a reply