इराणने ब्रिटन, इस्रायल व सौदीचे आरोप फेटाळले

Iran rejects allegationsतेहरान – इराणच्या शांतीपूर्ण अणुकार्यक्रमावर बिनबुडाचे आरोप अजिबात सहन केले जाणार नाहीत. खोट्या बातम्या आणि आरोपांचा आधार घेऊन इराणविरोधात अपप्रचार करणे, ही इस्रायलची जुनी खोड असल्याची टीका इराणने केली. तसेच राष्ट्रसंघाच्या बैठकीत अणुकार्यक्रमावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या ब्रिटन व सौदी अरेबियावरही इराणने तोफ डागली.

संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आयोजित विशेष सत्रात इस्रायल, सौदी अरेबिया व ब्रिटनने इराणचा अणुकार्यक्रम आखातातील असुरक्षिततेसाठी जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. इराण आखातातील दहशतवादी संघटनांना सर्व प्रकारचे लष्करी सहाय्य पुरवित असल्याचा आरोप इस्रायलने केला. तर सौदीने इराणच्या अणुकार्यक्रमामुळे आखातात तणाव निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली. इराणने अणुकार्यक्रमाचा वेग धोकादायकरित्या वाढविल्याचे ताशेरे ब्रिटनने ओढले आहेत.

राष्ट्रसंघातील इराणचे विशेषदूत हैदर अली बलौजी यांनी इस्रायल, सौदी व ब्रिटनच्या आरोपांचा समाचार घेतला. पुराव्याशिवाय इराणविरोधात अपप्रचार करण्याची इस्रायलची सवय असल्याची टीका बलौजी यांनी केली. तर इराणवर आरोप करण्याआधी सौदीने आत्मपरिक्षण करावे, असे सांगून इराणच्या दूतांनी सौदीच्या अल-उला येथील अणुप्रकल्पाची आठवण करून दिली.

leave a reply