होर्मुझच्या आखाताच्या सुरक्षेसाठी इराण अरब देशांशी सहाय्य करणार

- इराणच्या लष्करप्रमुखांचा इशारा

तेहरान- होर्मुझ तसेच ओमानचे आखात, या दोन सागरी क्षेत्रांच्या सुरक्षेसाठी इराण पर्शियन आखातातील शेजारी अरब देशांचे सहाय्य घेण्यासाठी सक्षम आहे, असा इशारा इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल मोहम्मद बाघेरी यांनी दिला. गेल्या आठवड्यात अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सच्या नौदलांनी होर्मुझच्या आखातात एकत्र प्रवास केला होता. अशा परिस्थितीत, कधीकाळी अमेरिकेबरोबर मैत्री असलेल्या अरब देशांबरोबरच्या सहकार्याचा उल्लेख करुन अमेरिकेने या क्षेत्रातील प्रभाव गमावल्याची जाणीव इराणने करुन दिली.

होर्मुझच्या आखाताच्या सुरक्षेसाठी इराण अरब देशांशी सहाय्य करणार - इराणच्या लष्करप्रमुखांचा इशाराआठवड्यापूर्वी इराणने होर्मुझ व ओमानच्या आखातातून प्रवास करणाऱ्या दोन ऑईल टँकर्सना ताब्यात घेतले होते. हे दोन्ही परदेशी टँकर्स इराणने आपल्या बंदर अब्बास येथे उभे केल्याचे फोटोग्राफ्स समोर आले होते. यानंतर पर्शियन आखात ते रेड सीपर्यंतच्या सागरी क्षेत्रातील प्रवासी व व्यापारी वाहतूकीच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. अमेरिकेने ‘युएसएस पॉल हॅमिल्टन’ ही विनाशिका ब्रिटन व फ्रान्सच्या विनाशिकांसह रवाना करुन या क्षेत्रातील कारवाईचे गंभीर परिणाम संभवतील, असा इशारा इराणला दिला होता.

अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सच्या विनाशिकांची ही गस्त नाट्यमय असल्याची टीका इराणने केली. होर्मुझच्या आखाताच्या सुरक्षेसाठी इराण अरब देशांशी सहाय्य करणार - इराणच्या लष्करप्रमुखांचा इशारातसेच आपल्या या सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी पर्शियन आखातातील शेजारी अरब देशांचे सहाय्य घेणार असल्याचे संकेत इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल मोहम्मद बाघेरी यांनी दिला. उघड उल्लेख केला नसला तरी सौदी अरेबिया, युएई या अरब देशांबरोबरील वाढत्या सहकार्याकडे इराण लक्ष वेधत असल्याचे दिसते.

चीनच्या मध्यस्थीने सौदी अरेबियाबरोबरील राजनैतिक सहकार्य प्रस्थापित झाल्यानंतर, इराणचा आत्मविश्वास दुणावला आहे. इराणने आखाती देशांबरोबरील लष्करी सहकार्यावर चर्चा सुरू केली आहे. त्याचबरोबर आपल्या अणुप्रकल्पांवर हल्ले झालेच, तर होर्मुझच्या आखातातून होणारी जागतिक इंधनाची वाहतूक बंद पाडली जाईल, अशा धमक्या इराण देत आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या स्पीड बोट्स यांची या क्षेत्रातील गस्त अमेरिकेच्या युद्धनौकांना देखील आव्हान देणारी ठरत आहे.

हिंदी

 

leave a reply