इस्रायली लष्कराच्या वेस्ट बँकमधील कारवाईत तीन दहशतवादी ठार

- मोठा दहशतवादी हल्ला उधळल्याची इस्रायलची घोषणा

तेल अविव – इस्रायलच्या संरक्षणदलाने वेस्ट बँकच्या नेब्लस भागात केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार केले तर आणखी तिघांना ताब्यात घेतले. इस्रायलमध्ये मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांवर संरक्षणदलाने ही कारवाई केली. इस्रायली सुरक्षा यंत्रणेने मोठा शस्त्रसाठा जप्त केला असून यामुळे मोठा दहशतवादी हल्ला उधळल्याची घोषणा इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी केली. पॅलेस्टाईनच्या मुद्यावरुन अरब लीग आक्रमक झालेले असताना इस्रायलची ही कारवाई लक्षवेधी ठरते.

इस्रायली लष्कराच्या वेस्ट बँकमधील कारवाईत तीन दहशतवादी ठार - मोठा दहशतवादी हल्ला उधळल्याची इस्रायलची घोषणाइस्रायलचे अंतर्गत सुरक्षामंत्री बेन ग्वीर यांनी जेरूसलेममधील टेंपल माऊंटला दिलेल्या भेटीनंतर वाद निर्माण झाला होता. इजिप्त, तुर्की, इराण आणि सौदी अरेबिया या देशांनी ग्वीर यांच्या भेटीचे व त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर टीका केली होती. यामुळे इस्रायल-पॅलेस्टाईन तणाव वाढल्याच्या बातम्या आल्या होत्या. याचा फायदा घेऊन वेस्ट बँकमधील दहशतवादी संघटना इस्रायलमध्ये मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत होती, असा आरोप इस्रायल करीत आहे.

वेस्ट बँकच्या नेब्लस भागातील ‘बलाटा’ भागात दहशतवादी मोठ्या शस्त्रसाठ्यासह दबा धरुन असल्याची माहिती मिळाली होती. या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यासाठी इस्रायलच्या संरक्षणदलाने रविवारी मध्यरात्री मोहीम हाती घेतली होती. इस्रायली लष्कराच्या वेस्ट बँकमधील कारवाईत तीन दहशतवादी ठार - मोठा दहशतवादी हल्ला उधळल्याची इस्रायलची घोषणापण सावध झालेल्या दहशतवाद्यांनी इस्रायली जवानांवर हल्ले सुरू केले. यामध्ये इस्रायली अधिकारी जखमी झाला. प्रत्युत्तरादाखल इस्रायली लष्कराने केलेल्या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले, तर तिघांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत सहा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी दिली.

दहशतवादी एका प्रयोगशाळेत लपून बसले होते. या ठिकाणे दहा किलोहून अधिक वजनाची स्फोटके सापडली असून याचा वापर मोठ्या हल्ल्यासाठी केला जाणार होता. त्याचबरोबर रायफल्स, स्फोटकांसाठीचे इलेक्ट्रॉनिक डिवायसेस देखील हस्तगत केल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराने दिला. बलाटा येथील कारवाईमुळे इस्रायलवरील मोठा दहशतवादी हल्ला उधळल्याची घोषणा इस्रायलचे संरक्षणमंत्री गॅलंट यांनी केली. ‘अल अक्सा मार्टर्स ब्रिगेड’ या दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या कारवाईत ठार झालेले दहशतवादी आपल्या संघटनेचे सदस्य होते, असे जाहीर केले. इस्रायली लष्कराच्या वेस्ट बँकमधील कारवाईत तीन दहशतवादी ठार - मोठा दहशतवादी हल्ला उधळल्याची इस्रायलची घोषणादरम्यान, गेल्या आठवड्यात सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे पार पडलेल्या अरब लीगच्या बैठकीत इस्रायल-पॅलेस्टाईनची समस्या प्राधान्यक्रमावर असल्याची ग्वाही देण्यात आली होती. इस्रायलने १९६७ सालच्या सीमा मान्य करून पॅलेस्टिनींना त्यांची भूमी परत करावी, अशी मागणी या बैठकीत झाली होती. याआधीही अशा स्वरुपाचे ठराव अरब लीगच्या बैठकीत करण्यात आले होते. पण १९६७ सालच्या युद्धात जिंकलेला भूभाग परत करण्यास इस्रायल तयार नाही. तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती खूपच बदललेली असल्याचे सांगून इस्रायलने या मागण्या धुडकावल्या आहेत.

अशा परिस्थितीत, जेद्दाह येथील अरब लीगच्या बैठकीत या मुद्याचा समावेश करण्यात आला होता. अरब लीगने पॅलेस्टाईनच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेले नाही, असा संदेश सौदीच्या प्रभावाखाली असलेल्या या बैठकीतून देण्यात आला होता.

हिंदी

 

leave a reply