इराणवर नजर ठेवण्यासाठी इस्रायलने रेड सीमधील तैनाती वाढविली

तैनाती वाढविलीऍटलिट – इसरायलच्या नौदलाने ‘रेड सी’च्या क्षेत्रातील आपल्या विनाशिकांची तैनाती वाढविली आहे. इस्रायलच्या संरक्षणदलाने या तैनातीचे कारण स्पष्ट करण्याचे टाळले. पण इस्रायलच्या मालवाहू व इंधनवाहू जहाजांच्या सुरक्षेला इराणकडून असलेला धोका लक्षात घेऊन ही तैनाती वाढविल्याचा दावा इस्रायलचे माजी नौदल अधिकारी करीत आहेत.

हिंदी महासागर आणि भूमध्य सागराला जोडणारे ‘रेड सी’चे क्षेत्र सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. या चिंचोळ्या सागरी क्षेत्रातून जागतिक व्यापाराच्या एकूण १० टक्के मालाची वाहतूक येथून होते. आशियाई देशांसाठी प्रवास करणारी इस्रायलची व्यापारी जहाजे देखील याच सागरी क्षेत्रातून प्रवास करतात.

पण गेल्या काही महिन्यांपासून या सागरी क्षेत्रातून प्रवास करणार्‍या इस्रायली तसेच सौदी, युएईच्या मालवाहू व इंधनवाहू जहाजांवर हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमागे इराण आणि इराणसंलग्न हौथी बंडखोर असल्याचा आरोप झाला होता. इस्रायल व इतर देशांच्या मालवाहू जहाजांवरील हल्ल्याबरोबर इराण या सागरी क्षेत्रातून शस्त्रास्त्रांची अवैध तस्करी करीत असल्याचेहीउघड झाले होते. लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेसाठी शस्त्रास्त्रे घेऊन जाणारे इराणी जहाज इस्रायलने ताब्यात घेतले होते. इराणने हे आरोप फेटाळले होते.

पण इस्रायलने या सागरी क्षेत्रातील विनाशिकांची तैनाती वाढवून इराणपासून असलेला धोका टाळण्यासाठी हाचलाची सुरू केल्याचे दिसत आहे. इस्रायलचे निवृत्त नौदल अधिकारी वाईस ऍडमिरल एली शारवित यांनी देखील रेड सीतील वाहतुकीला इराणपासून असलेला धोक्याकडे लक्ष वेधले. तसेच आपल्या सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्यासाठी इस्रायलने ही तैनाती केल्याचे सीतील यांचे म्हणणे आहे.

leave a reply