इस्रायल व पॅलेस्टाईनमधील संघर्ष अधिकच भडकला

- इस्रायलने संघर्षबंदीवरील चर्चा रोखली

तेल अविव – संघर्षबंदीसाठी प्रयत्न सुरू असतानाच, पॅलेस्टाईनमधून इस्रायलवर नवे रॉकेट हल्ले झाले. मंगळवारपासून आत्तापर्यंत आपल्या देशावर ९३७ रॉकेट्स आणि मॉर्टर्सचे हल्ले झाल्याची माहिती इस्रायली संरक्षणदलांच्या अधिकाऱ्यांनी दिली. जेरूसलेममध्येही रॉकेट कोसळल्याच्या बातम्या आल्या आहेत. या हल्ल्यांना इस्रायलकडून जबरदस्त प्रत्युत्तर दिले जात आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इस्लामिक जिहादचा बडा नेता ठार झाल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच या हवाई हल्ल्यांमध्ये पॅलेस्टाईनमध्ये ३२ बळी गेला असून यात मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते.

इस्रायल व पॅलेस्टाईनमधील संघर्ष अधिकच भडकला - इस्रायलने संघर्षबंदीवरील चर्चा रोखलीहमासनंतर गाझापट्टीतील पॅलेस्टिनींची सर्वात मोठी संघटना अशी ‘इस्लामिक जिहाद’ची ओळख आहे. इस्लामिक जिहादनेच इस्रायलवरील रॉकेट्स व मॉर्टर हल्ल्याचे सत्र सुरू केले होते. यानंतर इस्रायलने या संघटनेच्या वरिष्ठ कमांडरला ठार केले होते. त्याच्याही आधी इस्रायलने इस्लामिक जिहादच्या तीन कमांडर्सना हवाई हल्ल्यात संपविले. यानंतर शुक्रवारी देखील या पॅलेस्टिनी संघटनेचा आणखी एक कमांडर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र त्याचे तपशील समोर आले नव्हते. इस्रायलकडून असे घणाघाती हवाई हल्ले सुरू असतानाच, इस्लामिक जिहादने मंगळवारपासून ९३७ रॉकेट्स व मॉर्टर्सचा मारा करून इस्रायलला आव्हान दिल्याचे दिसत आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघटनेमध्ये सुरू असलेला हा संघर्ष अधिक भयावह स्वरुप धारण करील, अशी चिंता जगभरात व्यक्त करण्यात येत आहे. इजिप्तने हा संघर्ष थांबविण्यासाठी चर्चा सुरू केल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र गाझापट्टीतून झालेल्या नव्या हल्ल्यानंतर इस्रायलने ही शांतीचर्चा रोखली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी इस्लामिक जिहादला लक्ष्य करणारे अधिक तीव्र हल्ले चढवा, असे आदेश संरक्षणदलांना दिले आहेत. इस्रायल व पॅलेस्टाईनमधील संघर्ष अधिकच भडकला - इस्रायलने संघर्षबंदीवरील चर्चा रोखलीयामुळे इतक्यात तरी इस्रायल व इस्लामिक जिहादमधील हा संघर्ष थांबणार नसल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. इस्लामिक जिहादचे कमांडर इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाले आहेत, हा इस्रायलने हमाससाठी दिलेला इशारा ठरतो, असे सांगून इस्रायली अधिकारी हमासला या संघर्षापासून दूर राहण्याचा ‘संदेश’ देत आहेत. हमासने देखील इस्रायलवर हल्ले चढविले, तर हमासच्या नेत्यांनाही लक्ष्य केले जाईल, असे या संदेशाद्वारे इस्रायली संरक्षणदलांचे अधिकारी सुचवित आहेत.

इस्लामिक जिहाद, हमास या पॅलेस्टिनी संघटनांबरोबरच, लेबेनॉन व सिरियामध्ये तळ असलेले हिजबुल्ला आणि इतर इराणसमर्थक दहशतवादी संघटना एकाच वेळी इस्रायलला लक्ष्य करू शकतात, अशी दाट शक्यता वर्तविली जाते. याची जय्यत तयारी झाली असून एकाच वेळी हे हल्ले झाले तर इस्रायली शहरे जमीनदोस्त होतील, अशा धमक्या या संघटनांनी दिल्या होत्या. इस्रायलच्या संरक्षणदलांनी ही शक्यता लक्षात घेऊन आपली सुरक्षा यंत्रणा अधिक भक्कम केल्याचे दिसत आहे. तरीही इस्रायली हवाई सुरक्षा यंत्रणांना गाझातून होणारे सर्वच रॉकेटहल्ले रोखण्यात यश आलेले नाही. इस्रायली अधिकाऱ्यांनी ही बाब मान्य केली आहे. अशा परिस्थितीत आपल्यावर हल्ले चढविणाऱ्या पॅलेस्टिनी संघटनांची क्षमताच संपविणारे जबरदस्त हवाई हल्ले चढविण्याची तयारी इस्रायल करीत असल्याचे दिसते.

हिंदी English

 

leave a reply