इस्रायलने अमेरिकेच्या मदतीशिवाय इराणबरोबरील युद्धाची तयारी करावी

- इस्रायलचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

जेरूसलेम – आखातातील बदलती समीकरणे आणि अमेरिकेच्या बदलत्या प्राथमिकतेमुळे येथील सुरक्षा स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इस्रायलने युद्धाची तयारी ठेवावी. अमेरिकेच्या मदतीशिवायही इराणवर हल्ला करण्याची सज्जताही इस्रायलने ठेवावी, असे इस्रायलचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार याकोव्ह अमिद्रोर यांनी सुचविले आहे. तर बायडेन प्रशासनाने इराणला कुठल्याही प्रकारच्या सवलती नाकारुन ठामपणे इस्रायलच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक आहे, असे अमेरिकेतील विश्लेषक सुचवित आहेत. अन्यथा इस्रायल-इराण युद्ध भडकेल व यात अमेरिकेलाही सहभागी व्हावे लागेल, याकडे अमेरिकन विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये गाझापट्टी, लेबेनॉन आणि सिरिया अशा तीन आघाड्यांवरुन इस्रायलवर रॉकेट हल्ले झाले आहेत. सिरियातून इस्रायलच्या हद्दीत ड्रोनने देखील घुसखोरी केली होती. इस्रायलच्या संरक्षणदलांनी हे सारे रॉकेट हल्ले यशस्वीरित्या उधळले. तसेच गाझा, लेबेनॉन आणि सिरियातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांनाही लक्ष्य केले. गाझा व लेबेनॉनमधून झालेल्या हल्ल्यांसाठी हमास जबाबदार असल्याचा दावा केला जातो. पण सिरियाप्रमाणे गाझा, लेबेनॉनमधील हल्ल्यांमागे इराण असल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.

इस्रायलने अमेरिकेच्या मदतीशिवाय इराणबरोबरील युद्धाची तयारी करावी - इस्रायलचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारइस्रायलचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार याकोव्ह अमिद्रोर यांनी स्थानिक रेडिओवाहिनीशी बोलताना आपल्या देशावर झालेल्या रॉकेट हल्ल्यांमागे इराणच असल्याचे ठासून सांगितले. सौदी अरेबिया आणि युएईबरोबर संबंध सुधारण्यासाठी इराणने पावले उचलली आहेत. त्यामुळे इराणचा आत्मविश्वास वाढला असून आखाती देशांपासून आपल्या सुरक्षेला धोका नसल्याची जाणीव झालेल्या इराणने इस्रायलला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचा आरोप अमिद्रोर यांनी केला.

हे रॉकेट हल्ले होत असताना इस्रायलच्या सुरक्षेबाबत वचनबद्धता सांगणाऱ्या अमेरिकेच्या भूमिकेवरही अमिद्रोर यांनी प्रश्न उपस्थित केला. ‘अमेरिकेचे नेतृत्व आणि आखातातील तैनाती पहिल्यासारखी राहिलेली नाही, याची इराणला पुरेपूर कल्पना आहे. आखातात अमेरिकेसमोरील समस्या वाढल्या आहेत’, असे सांगून अमिद्रोर यांनी सौदी-युएईने बायडेन प्रशासनाकडे पाठ फिरविल्याची आठवण करुन दिली. इस्रायलने अमेरिकेच्या मदतीशिवाय इराणबरोबरील युद्धाची तयारी करावी - इस्रायलचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारइस्रायलबाबतही बायडेन प्रशासनाची वेगळी भूमिका नसल्याची टीका इस्रायलच्या माजी सुरक्षा सल्लागारांनी केली.

इस्रायल तसेच आखातातील सुरक्षेविषयीच्या भूमिकेत बदल झालेल्या अमेरिकेवर इराणविरोधी युद्धासाठी अवलंबून राहणे परवडणारे नसल्याचे अमिद्रोर सुचवित आहेत. त्यामुळे इस्रायलने देखील अमेरिकेच्या सहाय्याशिवाय इराणवर हल्ल्याची तयारी करावी, अशी भूमिका अमिद्रोर यांनी मांडली. इस्रायलच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांप्रमाणे आखातविषयक अमेरिकेचे विश्लेषक एरिक मँडेल यांनी देखील बायडेन प्रशासनाच्या इस्रायल व इराणबाबतच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.

गेल्या आठवड्यात इस्रायलवर झालेल्या रॉकेट हल्ल्यांसाठी इराण जबाबदार असल्याचे उघड आहे. तरी देखील बायडेन प्रशासनाने इराणविरोधात भूमिका घेतलेली नाही, यावर मँडेल यांनी आश्चर्य व्यक्त केले. सध्या हमास, हिजबुल्लाह, इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटना एकाचवेळी इस्रायलवर हल्ल्याच्या तयारीत आहे. इस्रायलने अमेरिकेच्या मदतीशिवाय इराणबरोबरील युद्धाची तयारी करावी - इस्रायलचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारअशावेळी इस्रायलच्या सुरक्षेची हमी घेणाऱ्या अमेरिकेने आपल्या वचनबद्धतेचे पालन करावे, असे आवाहन मँडेल यांनी केले.

त्याचबरोबर पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याबरोबरचे वाद बाजूला ठेवून इस्रायलच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे. जॉर्डन, इजिप्त आणि पॅलेस्टिनी प्रशासनाला हाताशी घेऊन गाझा, लेबेनॉन व सिरियातून इस्रायलवर होणारे रॉकेट हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असेही मँडेल यांनी सुचविले. हे सारे करीत असताना बायडेन प्रशासनाने इराणला निर्बंधातून सवलत देण्याचे थांबवावे. अन्यथा इराणला दिलेले सहाय्य हमास, हिजबुल्लाह आणि इतर दहशतवादी संघटनांना वळते होईल आणि यामुळे आखातात वणवा भडकेल, असा इशारा मँडेल यांनी दिला.

हिंदी

 

leave a reply