इस्रायली पोलिसांनी दगड उचलणाऱ्यांवर गोळी चालविण्यासाठी सज्ज रहावे

- इस्रायलचे वरिष्ठ नेते बेन-ग्वीर

दगड उचलणाऱ्यांवरजेरूसलेम – ‘इस्रायलचा द्वेष करणाऱ्या आणि हिंसाचारासाठी दगड उचलणाऱ्यांवर इस्रायली पोलिसांनी गोळी चालविण्यासाठी सज्ज रहावे. कारण हे दगड एखाद्याची हत्या घडवू शकतात. अशा इस्रायलद्वेष्ट्यांच्या डोक्यातच गोळी झाडली पाहिजे, असे काही नाही. पायावर गोळी मारुनही त्यांच्यावर कारवाई होऊ शकते’, असा इशारा इतमार बेन-ग्वीर यांनी दिला. पंतप्रधान घोषित बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या आगामी सरकारमध्ये पोलीस मिनिस्टर म्हणून बेन-ग्वीर लवकरच जबाबदारी सांभाळणार आहेत.

इस्रायलच्या न्यायव्यवस्थेने पोलिसांवर कठोर नियम लादले आहेत. हल्लेखोरांकडून जीवाचा गंभीर धोका असेल तरच पोलिसांना गोळीबार करण्याची परवानगी आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून वेस्ट बँक परिसरात इस्रायली पोलीस दलावरील दहशतवादी तसेच कट्टरपंथियांचे हल्ले वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर, इस्रायली पोलिसांच्या अधिकारांमध्ये वाढ करण्याची मागणी सुरू होती. अशा परिस्थितीत लवकरच पोलीस मिनिस्टर म्हणून अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या बेन-ग्वीर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना वाढीव अधिकार देण्याचे संकेत दिले आहेत.

नेत्यान्याहू यांच्या आगामी सरकारमध्ये बेन-ग्वीर यांचा झालेला समावेश व त्यांच्याकडे पोलीस मिनिस्टर म्हणून दिलेल्या जबाबदारीमुळे बायडेन प्रशासन नाराज असल्याचा दावा केला जातो.

हिंदी

leave a reply