पाकिस्तानच्या पळपुट्या लष्करामुळे भारताला काश्मीरमध्ये यश मिळाले

‘अल कायदा इन इंडियन सबकॉन्टीनंट’चा दावा

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या पळपुट्या लष्करामुळे काश्मीरमध्ये भारताला मोठे यश मिळत आहे, असा दावा ‘अल कायदा इन इंडियन सबकॉन्टीनंट-एक्यूआयएस’ने केला आहे. भारताने कलम ३७० हटवून काश्मीरवर नियंत्रण प्रस्थापित केले. याला प्रत्युत्तर देण्याच्या ऐवजी पाकिस्तानने भित्र्यासारखी कमकुवत प्रतिक्रिया दिली. आजही काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यास पाकिस्तानचे भेकड लष्कर तयार नाही, असा ठपका ‘एक्यूआयएस’ने ठेवला आहे. अफगाणिस्तानातील तालिबानबरोबर पाकिस्तानचा संघर्ष सुरू होणार असल्याचे उघड झाले आहे. अशा परिस्थितीत अल कायदाची भारतीय उपखंडातील शाखा असलेल्या ‘एक्यूआयएस’ने पाकिस्तानच्या लष्करावर केलेली ही टीका लक्ष वेधून घेणारी ठरते.

Pakistan's fledgling army३७० कलम मागे घेऊन भारताने काश्मीरच्या भूभागावर नियंत्रण प्रस्थापित केले. मात्र पाकिस्तानी लष्कराच्या पळपुटेपणामुळे काश्मीरमधील जनतेकडून सुरू असलेली निदर्शनेही संपुष्टात आली, असा दावा एक्यूआयएसने केला. इतकेच नाही तर पाकिस्तानचे लष्कर भ्याड असल्याची घणाघाती टीका करून या लष्कराकडून काश्मीरचा प्रश्न सुटणे शक्यच नसल्याचे एक्यूआयएसने बजावले आहे. पाकिस्तानी लष्कराला काश्मीरच्या मुद्यावर सतत मिळत असलेली ‘नाकामी’ अर्थात अपयश क्लेशदायक असल्याचेही एक्यूआयएसने म्हटले आहे. तर ‘अन्सार गझ्वातूल हिंद’ हीच खरीखुरी दहशतवादी संघटना असल्याचा दावा एक्यूआयएसने केला.

पाकिस्तानच्या लष्कराची संभावना करून एक्यूआयएसने भारताला काश्मीरमध्ये यश मिळत असल्याचे दावे केले, तरी पुढच्या काळात ही दहशतवादी संघटना जम्मू व काश्मीरमध्ये घातपात माजविण्याची तयारी करीत असल्याचे संकेत दिले आहेत. या घातपातामागे पाकिस्तानचा हात नसल्याचा प्रचार एक्यूआयएसने आत्तापासूनच सुरू केला आहे, की खरोखरच ही दहशतवादी संघटना पाकिस्तानी लष्कराच्या असहकार्यामुळे ही टीका करी आहे, ते स्पष्ट झालेले नाही. पण ही दहशतवादी संघटना आरोप करीत आहे, त्यानुसार पाकिस्तानी लष्कराने आपल्या सर्वच दहशतवादी कारवाया थांबविलेल्या नाहीत.

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून घुसखोरी करून जम्मू व काश्मीरमध्ये घातपात माजविण्याच्या तयारी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी केलेली आहे. मात्र सध्या पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. फायनॅन्शिअल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये असलेल्या पाकिस्तानला आपला दहशतवादी संघटनांशी संबंध नसल्याचे जगाला दाखवायचे होते. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराने आपल्या दहशतवादी कारवायांना लगाम लावला होता. त्याचवेळी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसून हल्ले चढविण्याचे इशारे भारताने याआधीच देऊन ठेवलेले आहेत, त्याचाही परिणाम पाकिस्तानी लष्कराच्या कारवायांवर झालेला आहे.

म्हणूनच दहशतवाद्यांना सहाय्य केल्याचा आरोप आपल्यावर होणार नाही, अशारितीने जम्मू व काश्मीरमध्ये घातपात घडविण्याची तयारी पाकिस्तान करीत असल्याचे समोर येत आहे.

leave a reply