जपानने उघुरांसंदर्भातील गोपनीय माहिती अमेरिका व ब्रिटनला दिल्याचा दावा

गोपनीय माहितीटोकिओ – चीनकडून उघुरवंशियांवर होत असलेल्या अत्याचाराची गोपनीय माहिती जपानने अमेरिका व ब्रिटनच्या यंत्रणांना पुरविली होती, असा दावा सूत्रांनी केला आहे. या माहितीच्या आधारावरच अमेरिका व ब्रिटनने उघुरांच्या मुद्यावर चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. अमेरिका व ब्रिटनचा समावेश असलेल्या ‘फाईव्ह आईज अलायन्स’ या आघाडीत जपानचा समावेश करावा, यासाठी गेली काही वर्षे हालचाली सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर हे वृत्त समोर येणे लक्ष वेधून घेणारे ठरते. गुप्तचर यंत्रणांचा गट ही ओळख असणार्‍या ‘फाईव्ह आईज अलायन्स’मध्ये ऑस्ट्रेलियासह अमेरिका, कॅनडा, ब्रिटन व न्यूझीलंडचा समावेश आहे.

leave a reply