इराणमधून निसटलेल्या कुर्द तरुणींनी शस्त्रे हातात घेतली

कुर्दपॅरिस – हिजाबसक्तीच्या विरोधात पेटलेल्या आंदोलनावर इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे शेकडो कुर्द नागरिक इराकमध्ये आश्रय घेत आहेत. यातील इराणी तरुणी व महिलांनी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. इराणविरोधी संघर्षासाठी या तरुणी शस्त्रसज्ज होत असल्याचा दावा एका पाश्चिमात्य वृत्तवाहिनीने केला.

तीन महिन्यांपूर्वी माहसा अमिनी या २२ वर्षीय कुर्द तरुणीच्या हत्येनंतर इराणमध्ये हिजाबसक्तीच्या विरोधात आंदोलन पेटले होते. यानंतर इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी कुर्दवंशियांना लक्ष्य केले होते. इराणच्या कुझेस्तान, केरमानशाह, इलाम आणि कोर्देस्सतान या प्रांतातील तसेच इतर शहरातील कुर्दांवर कारवाई सुरू केली होती. यात कुर्दांचा बळी जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

या कारवाईतून बचावलेल्या कुर्दांनी इराणमधून बाहेर पडून इराकच्या कुर्दिस्तान प्रांतात आश्रय घेतला आहे. यातील इराणी तरुण-तरुणींनी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण सुरू केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे स्वतंत्र कुर्दिस्तानसाठीचा संघर्ष अधिकच तीव्र होऊ शकतो, असे पाश्चिमात्य विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply