जम्मू-काश्मीरमधील लिथियम साठ्यामुळे भारत ई-वाहनांचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश बनेल

- केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्र्यांचा दावा

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा प्रचंड मोठा साठा आढळला आहे. हा साठा भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतो. इलेक्ट्रॉनिक्स व वाहन उत्पादन क्षेत्रात यामुळे भारताला मोठी झेप घेता येईल, असे दावे करण्यात येत आहेत. केंद्रीय केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात याला दुजोरा दिला. या लिथियम साठ्यामुळे भारत जगात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणारा पहिल्या क्रमांकाचा देश बनू शकेल, असा दावा केंद्रीयमंत्री गडकरी यांनी केला.

जम्मू-काश्मीरमधील लिथियम साठ्यामुळे भारत ई-वाहनांचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश बनेल - केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्र्यांचा दावाभारताला सध्या दरवर्षी 1200 टन लिथियम आयात करावे लागते. सोलार पॅनल, इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामध्ये माबाईल बॅटरीसाठी याचा वापर होतो. याशिवाय लिथियम आयन बॅटरी यापासून बनविल्या जातात. या लिथियम आयन बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जातात. जम्मू-काश्मीरमध्ये सापडलेल्या लिथियमचा वापर लिथियम आयन बॅटरीज्‌‍मुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या विभागात मोठी कामगिरी करता येईल. या विभागात भारत सर्वाधिक वाहनांचे उत्पादन घेणारा देश बनेल, असा केंद्रीयमंत्री गडकरी यांनी अधोरेखित केले. ‘सीआयआय’ या उद्योजकांच्या प्रमुख संघटनेने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

भारतीय वाहनउद्योग क्षेत्र सध्या 7.5 लाख कोटींचे आहे. भारताच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा मोठा हिस्सा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 59 लाख टन इतके लिथियम रिझर्व्ह जीएसआयच्या सर्वेक्षणात आढळले आहे. लिथियम हे क्रिटिकल रिसोर्सेस अर्थात दुर्लभ साधनसंपत्तीमध्ये मोडते. जम्मू-काश्मीरमधील लिथियम साठ्यामुळे भारत ई-वाहनांचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश बनेल - केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्र्यांचा दावाभारतात या खनिजाची 100 टक्के आयात करावी लागत होती. मात्र जम्मू-काश्मीरमधील लिथियम साठ्याने भारताला या खनिजाची आयात करावी लागणार नाही.

2022 सालात भारत जपानला मागे टाकत जगातील तिसऱ्या क्रमाकांची सर्वात मोठी बाजारपेठ बनला आहे. चीन आणि अमेरिकेनंतर सर्वात मोठी बाजारपेठ सध्या भारत आहे. तसेच देशात विकासासाठी चांगल्या पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. संशोधनावर भर दिला व त्यादृष्टीने काम केले तर अनेक मागास क्षेत्रांचाही विकास करता येईल, तसेच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. लिथियममुळे भारत ई-वाहन निर्मिती क्षेत्रात मोठी झेप घेता येईल, असे गडकरी म्हणाले.

यावेळी त्यांनी उद्योजकांनी व्हेईकल स्क्रपिंग प्लांटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. तसेच देशातील वाहतूक खर्च 2024 सालापर्यंत 16 टक्क्यांवरून एक आकडी संख्येत आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

leave a reply