राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या दुबळ्या नेतृत्वामुळे जगभरात अमेरिकेची नाचक्की

- अमेरिकेच्या विरोधी पक्षनेत्यांची टीका

वॉशिंग्टन – इराणच्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इराणबाबत दिलेली प्रतिक्रिया जगभरात अमेरिकेचे नेतृत्त्व दुबळे असल्याचे दाखवून देणारी होती. याचे अजिबात समर्थन करता येणार नाही. बायडेन यांच्या अशा कचखाऊ नेतृत्वामुळे शत्रू देशांवर अमेरिकेचा वचक राहिलेला नाही, अशी जळजळीत टीका रिपब्लिकन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केली. अफगाणिस्तानातील सैन्यमाघार, चीनचे स्याप बलून, रशियन विमानाने अमेरिकन ड्रोनजवळून केलेला प्रवास, या मुद्यांवरही बायडेन यांनी कमकुवतपणा दाखवून दिला. यामुळेच रशिया, चीन व इराण असे अमेरिकेचे शत्रूदेश मजबूत होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या निक्की हॅले यांनी केला.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या दुबळ्या नेतृत्वामुळे जगभरात अमेरिकेची नाचक्की - अमेरिकेच्या विरोधी पक्षनेत्यांची टीकाराष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या दुबळ्या नेतृत्वामुळे जगभरात अमेरिकेची नाचक्की - अमेरिकेच्या विरोधी पक्षनेत्यांची टीकागेल्या महिन्याभरात अमेरिकेच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या घटनांचे पडसाद उमटू लागले आहेत. अमेरिकन काँग्रेस तसेच अमेरिकन माध्यमांमधून बायडेन प्रशासनावर जोरदार टीका सुरू झाली आहे. सलग दोन दिवस सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर ड्रोन्स तसेच क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले. यामध्ये अमेरिकेचा कंत्राटदार ठार झाला. यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला. पण लष्करीदृष्ट्या इराणपेक्षा कितीतरी अधिक मजबूत असलेल्या अमेरिकेने इराणला अद्दल घडविण्याची गरज होती. यापुढे इराणने अमेरिकन जवानांवर हल्ला चढविण्याची हिंमत केली नसती. पण बायडेन यांच्या प्रतिक्रियेने अमेरिकेला इराणच्या पंक्तीत नेऊन बसविले, असे टीकास्त्र अमेरिकन सिनेटर्स लिंडसे ग्रॅहम, टॉम कॉटन यांनी सोडले.

तर गेल्या आठवड्यात रशियाच्या लढाऊ विमानाने अमेरिकेचे ड्रोन पाडले. यानंतर अमेरिकेने रशियाला उत्तर देणे अपेक्षित होते. पण याबाबत निर्णय घेण्यातही बायडेन प्रशासन अपयशी ठरले. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या दुबळ्या नेतृत्वामुळे जगभरात अमेरिकेची नाचक्की - अमेरिकेच्या विरोधी पक्षनेत्यांची टीकाराष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या दुबळ्या नेतृत्वामुळे जगभरात अमेरिकेची नाचक्की - अमेरिकेच्या विरोधी पक्षनेत्यांची टीकातर काही दिवसांपूर्वी रशिया आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांमधील चर्चा अमेरिकेला आव्हान देणारी होती. या देशांमध्ये अमेरिकेचा अजिबात वचक राहिलेला नाही, हेच या भेटीतून स्पष्ट झाले, अशी टीका रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हॅले यांनी केली. अमेरिकेतील अभ्यासगटातील विश्लेषकांनीही बायडेन यांच्या कमकुवत नेतृत्वामुळे अमेरिकेचा प्रभाव ओसरल्याचे लक्षात आणून दिले.

दरम्यान, बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यापासून इराणसंलग्न दहशतवादी संघटनांचे इराक-सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवरील हल्ले वाढल्याचा दावा रिपब्लिकन सिनेटर माईक वॉल्ट्झ यांनी केला. तर अफगाणिस्तानातील बेजबाबदार माघारीपासून अमेरिकेच्या नेतृत्वातील उणीवा जगासमोर दिसू लागल्या व शत्रूदेशांना याचा फायदा घेतल्याचा आरोप माजी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी केला.

हिंदी

 

leave a reply