सुरतच्या ‘ओएनजीसी’ प्रकल्पामध्ये भीषण स्फोट

'ओएनजीसी'अहमदाबाद – गुरुवारी पहाटे गुजरातच्या सुरतमधल्या हजिरा इथील ‘ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन’चा(ओएनजीसी) प्रकल्प तीन शक्तिशाली स्फोटाने हादरला. त्यानंतर या प्रकल्पामध्ये मोठी आग भडकली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे ‘ओएनजीसी’ने म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दुर्घटनेनंतर यंत्रणेशी सतत संपर्क ठेवून होते.

गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास हजिरा येथील ‘ओएनजीसी’ प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटाचा आवाज दहा किलोमीटर पर्यंत ऐकायला गेल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबरहाट पसरली होती. तसेच आगीचे लोळही दूरपर्यंत दिसत होते. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सात फायर टेंडर्स आणि फायरफायटर्स आले. सुदैवाने या स्फोटात जीवितहानी झाली नाही.

'ओएनजीसी'

आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे ‘ओएनजीसी’ने म्हटले. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून सर्व टर्मिनल्स बंद करण्यात आले आहेत. काही तासात प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी माहिती ‘ओएनजीसी’ने दिली.

leave a reply