नागालँड, मेघालय व त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर

नवी दिल्ली – नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. तसेच पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्याही निकालांची घोषणा निवडणूक आयोगाने केली. नागालँडमध्ये ‘नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स’ या आघाडीला बहुमत मिळाले आहे. या आघाडीमध्ये ‘नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी-एनडीपीपी’ व भारतीय जनता पक्षाचा समावेश आहे. तर मेघालयामध्ये नॅशनल पिपल्स पार्टीला (एनपीपी) सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाले आहे.

election results announced१६ फेब्रुवारी रोजी त्रिपुरा, तर नागालँड आणि मेघायलमध्ये २७ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणूका पार पडल्या होत्या. गुरुवारी याची मतमोजणी सुरू झाली. अवघ्या काही तासातच या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले.नागालँडमध्ये नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स’ या आघाडीमध्ये सहभागी असलेल्या ‘नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी-एनडीपीपी’ व भारतीय जनता पक्षाला मिळून ३७ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये एनडीपीपीच्या २५ व भारतीय जनता पक्षाच्या १२ जागांचा समावेश आहे.

मेघालयात ‘एनपीपी’ला २६ जागांवर विजय मिळाला असून हा या राज्यातील सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. तर युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीने ११ जागांवर विजय मिळविला आहे. तर त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाने ३२ जागांवर विजय मिळवून बहुमत जिंकले आहे. याबरोबरच अरुणाचल प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणुकीचे निकालही जाहीर झाले आहेत.

पुणे कसबा येथील विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर तर पिंपरी चिंचवड येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय झाला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष, झारखंडमध्ये ‘ऑल झारखंड स्टुडंटस्‌‍ युनियन-एजीएसयु’, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी ठरले आहेत.

leave a reply