चीनबरोबरील व्यापारी संघर्षात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाच्या पाठीशी – न्यूझीलंडची ग्वाही

व्यापारी संघर्षातवेलिंग्टन – ऑस्ट्रेलिया व चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारी संघर्षात न्यूझीलंड ‘थर्ड पार्टी’ असून आम्ही ऑस्ट्रेलियाबरोबर आहोत, अशी ग्वाही न्यूझीलंडचे व्यापारमंत्री डॅमिअन ओकॉनर यांनी दिली. यावेळी त्यांनी चीनचा थेट उल्लेख न करता नियमांवर आधारलेली जागतिक व्यापारव्यवस्था कायम राहणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन रविवारपासून न्यूझीलंढच्या दौर्‍यावर आहेत. चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील सहकार्य हा दौर्‍यातील प्रमुख अजेंडा असल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर न्यूझीलंडच्या वरिष्ठ मंत्र्यांनी केलेल वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते.

गेल्या वर्षभरात चीनने ऑस्ट्रेलियातून आयात होणार्‍या बार्ली, कोळसा, लाकूड यासह अनेक उत्पादनांवर निर्बंध लादले आहेत. काही दिवसांपूर्वी, चीनने ऑस्टे्रलियाबरोबरील महत्त्वपूर्ण आर्थिक कराराच्या चर्चेला अनिश्‍चित काळासाठी स्थगिती देत असल्याचेही जाहीर केले होते. त्यापाठोपाठ चीनने ऑस्ट्रेलियाकडून आयात होणार्‍या नैसर्गिक इंधनवायू तसेच कच्च्या लोखंडासाठी नव्या पर्यायांची चाचपणी सुरू केल्याचे वृत्त समोर आले आहे.

leave a reply