साऊथ चायना सी व तैवानच्या क्षेत्रातील चीनच्या कारवायांवर न्यूझीलंडची नाराजी

बीजिंग – साऊथ चायना सी तसेच तैवानच्या क्षेत्रात चीनकडून सुरू असलेल्या कारवायांवर न्यूझीलंडने तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नुकताच चीनचा दौरा केला. या दौऱ्यात चीनचे परराष्ट्रमंत्री व वरिष्ठ नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेत परराष्ट्रमंत्री माहुता यांनी न्यूझीलंडला वाटणारी चिंता स्पष्टपणे बोलून दाखविली, असे न्यूझीलंडच्या परराष्ट्र विभागाकडून सांगण्यात आले. यावेळी झिंजिआंगमधील उघुरवंशिय तसेच हाँगकाँगमधील मानवाधिकारांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आल्याचे न्यूझीलंडच्या परराष्ट्र विभागाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

साऊथ चायना सी व तैवानच्या क्षेत्रातील चीनच्या कारवायांवर न्यूझीलंडची नाराजी‘साऊथ चायना सी’मधील ‘नाईन डॅश लाईन’च्या क्षेत्रावर चीनने आपला दावा सांगितला आहे. व्हिएतनाम, फिलिपाईन्स व मलेशियाचे या सागरी तसेच हवाई क्षेत्रावरील हक्क चीनला अजिबात मान्य नाहीत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या मुद्यावर फिलिपाईन्सच्या बाजूने दिलेला निकालही चीनने पायदळी तुडविला आहे. त्याचबरोबर चीनच्या संरक्षणदलांकडून तैवानमध्ये सातत्याने घुसखोरी सुरू असून विविध माध्यमांमधून तैवानवर दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चीनच्या या कारवायांविरोधात अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. ‘आशिया-पॅसिफिक’ क्षेत्रातील देशांनीही चीनचा दबाव झुगारून नाराजीचे सूर व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. साऊथ चायना सी व तैवानच्या क्षेत्रातील चीनच्या कारवायांवर न्यूझीलंडची नाराजीयात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान, व्हिएतनाम यासारखे देश आघाडीवर आहेत. मात्र न्यूझीलंडने आतापर्यंत चीनच्या बाबतीत मवाळ धोरण स्वीकारले आहे. अमेरिका पुरस्कृत ‘फाईव्ह आईज्‌‍’ या गटाचा सदस्य असतानाही न्यूझीलंडने चीनसंदर्भात स्वीकारलेली भूमिका आश्चर्यजनक मानली जाते.

या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेला चीनचा दौरा व त्याअखेरीस केलेली वक्तव्ये लक्ष वेधून घेणारी ठरतात. परराष्ट्रमंत्री नानिआ माहुता यांनी आपल्या दौऱ्यात चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग व वरिष्ठ सल्लागार वँग यी यांच्यासह चीनमधील वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योजकांशी चर्चा केली. चर्चेत माहुता यांनी साऊथ चायना सी, तैवान, झिंजिआंग व हाँगकाँगचा मुद्दा उपस्थित केल्याची माहिती निवेदनात देण्यात आली. साऊथ चायना सी व तैवानच्या क्षेत्रातील चीनच्या कारवायांवर न्यूझीलंडची नाराजीत्याचबरोबर चीनकडून रशियाला पुरविण्यात येणाऱ्या शस्त्रांचा मुद्दाही माहुता यांनी मांडल्याचे न्यूझीलंडकडून सांगण्यात आले.

चीनला अडचणीत आणणारे मुद्दे उपस्थित करून न्यूझीलंडने पहिल्यांदाच चीनविरोधात उघडपणे भूमिका घेतल्याचे दिसत आहे. ही बाब चीनसमोरील आव्हाने अधिकच वाढविणारी असल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत. यापूर्वी चीनविरोधात न बोलणारे देश आता पुढे येऊन उघडपणे बोलू लागल्याचे संकेत न्यूझीलंडच्या बदलत्या भूमिकेतून मिळत असल्याचेही विश्लेषकांचे म्हणणे आहे. माहुता यांच्या वक्तव्यावर चीनकडून अजूनही प्रतिक्रिया नोंदविण्यात आलेली नाही.

हिंदी English

 

leave a reply