देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८५.५ लाखांवर

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८५.५ लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच या साथीने दगावणाऱ्यांची संख्या १ लाख २६ हजारांवर पोहोचली आहे. त्याचवेळी नव्या आणि ॲक्टिव्ह केसेसची संख्या सतत घटत आहे. देशातील ॲक्टिव्ह केसेसची संख्या ५ लाख १२ हजारांपर्यंत खाली आली आहे. आतापर्यंत देशात आढळलेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत ही संख्या ६ टक्के आहे.

८५.५

देशातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९२.४९ टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत ७८ लाख ६७ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या ३७ दिवसांपासून आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या घटत आहे. ही फार मोठी दिलासा देणारी बाब ठरत आहे. शनिवारी देशात ४५ हजार नवे रुग्ण आढळले होते. तर शुक्रवारी ५० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी आढळलेल्या नव्या रुग्णांची संख्या ९ टक्क्यांनी कमी आहे.

रविवारी महाराष्ट्रात ११० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ हजार ९२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. तर एकाच दिवसात ८२३२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार ३२२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या एकूण ९६ हजार ३७२ ॲक्टिव्ह रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९१. ७१ टक्क्यांवर पोहोचले आहे. एकाच दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्यामध्ये केरळ आघाडीवर असून गेल्या २४ तासात ७,१२० रुग्ण बरे झाले आहेत.

दरम्यान दिल्लीमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढत होत असून राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले. नागरिकांचा निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष यासाठी कारणीभूत असल्याचा ठपका जैन यांनी ठेवला आहे.

leave a reply