अफगाणिस्तानातील गझनीमध्ये तालिबानच्या मॉर्टर्स हल्ल्यात आठ जणांचा बळी

काबूल – रविवारी अफगाणिस्तानच्या गझनी शहरातील नव अबादमध्ये नागरी वस्त्यांना लक्ष्य करुन तालिबानने चढविलेल्या मॉर्टर्सच्या हल्ल्यात आठ जणांचा बळी गेला. तसेच या हल्ल्याला काही तास उलटत नाही तोच कंदहारमध्ये बॉम्बस्फोट झाला असून यामध्ये ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. गेल्या तीन महिन्यात अफगाणिस्तानातील तालिबानचे हल्ले ५० टक्क्यांनी वाढले आहेत.

अफगाणिस्तानाच्या गझनीमध्ये तालिबानच्या मॉर्टर्स हल्ल्यात आठ जणांचा बळीरविवारी संध्याकाळच्या सुमारास गझनीधील नव अबादमधील नागरी वस्तीत तालिबानने मोर्टर्सचे हल्ला केला. यातील दोन मॉर्टर्स नागरी वस्तीत कोसळले. या हल्ल्यात आठ जणांचा बळी गेला. तर सात हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यांनतर नागरिकांनी या भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यानंतर तालिबानने कंदहारमध्ये घडविलेल्या बॉम्बस्फोटात ३० जण जखमी झाले.

अफगाणिस्तानाच्या गझनीमध्ये तालिबानच्या मॉर्टर्स हल्ल्यात आठ जणांचा बळीदरम्यान, अफगाणिस्तानचे सुरक्षा दल आणि तालिबानमधला संघर्ष भयावहरीत्या वाढत चालला आहे. अफगाणिस्तानाच्या कंदहार आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये तालिबानचे दहशतवादी हल्ले चढवित आहेत. या दहशतवाद्यांना थोपविण्यासाठी अफगाणी सुरक्षादलांनी जोरादार कारवाई हाती घेतली आहे. या कारवाईचे नेतृत्व अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख जनरल यासिन झिया करीत आहेत.

अफगाणिस्तानाच्या हेल्मंडमधलाधील संघर्ष कमी झाला आहे. पण कंदहारमध्ये अजून सुरक्षादल आणि तालिबानमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. या हिंसाचारात अनेक घरांची नासधूस झाली आहे. हजारोंच्या संख्येने नागरिक विस्थापित झाले आहेत. हा हिंसाचार असाच कायम राहिला तर अफगाणिस्तानाच्या शांतीचर्चेला धोका निर्माण होईल, अशी भिती अफगाणिस्तानातील अमेरिका आणि नाटोचे कमांडर जनरल स्कॉट मिलर यांनी व्यक्त केली.

leave a reply