देशातील कोरोनाच्या बळींची संख्या २५ हजारांवर

नवी दिल्ली – देशात मंगळवारी एका दिवसात कोरोनामुळे ५८२ जण दगावले होते. यामुळे देशातील या साथीच्या बळींची संख्या २४,३०९ वर पोहोचली होती. बुधवारी रात्रीपर्यंत देशभरात ५०० हून अधिक बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील या साथीने दगावलेल्यांची संख्या २५ हजारांजवळ पोहोचली. महाराष्ट्रातच बुधवारी २३३ जण दगावले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील या साथीने दगावलेल्यांची संख्या ११ हजारांजवळ पोहोचली आहे. तामिळनाडूत दिवसभरात ६८ जणांचा बळी गेला असून दिल्लीत दिवसभरात ४१ जण दगावले.

Corona-Stateदेशात बुधवारी सकाळपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ९,३६,१८१ वर पोहोचली होती. चोवीस तासात २९ हजार ४२९ नवे रुग्ण आढळले. देशात ५ लाख ९२ हजार रुग्ण बरे झाले असून ३ लाख १९ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. बुधवारी रात्रीपर्यंत आणखी २५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे राज्यांकडून जाहीर माहितीनुसार स्पष्ट होते. यामुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ९ लाख ६० हजारांवर पोहोचल्याचे स्पष्ट होते.

महाराष्ट्रात दिवसभरात ७,९७५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या पावणे तीन लाखांवर पोहोचली आहे. तामिळनाडूत ४४९६ नवे रुग्ण आढळले असून या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या दीड लाखांच्यावर पोहोचली आहे. दिल्लीत १६४७ नवे रुग्ण आढळले असून या राज्यातील रुग्ण संख्या १ लाख १६ हजारांवर पोहोचली आहे.

leave a reply