अमेरिकेतील कोरोनाच्या बळींची संख्या नऊ लाखांवर असू शकते

-राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे सल्लागार अँथनी फॉसी यांचा दावा

वॉशिंग्टन – अमेरिकेत कोरोनाच्या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या ९ लाखांपर्यंत असू शकते, असा दावा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार अँथनी फॉसी यांनी केला. यावेळी फॉसी यांनी, अमेरिकी अभ्यासगटाच्या अहवालाकडे लक्ष वेधून, त्यांनी वर्तविलेल्या अंदाजांचा विचार करता गेल्या १०० वर्षात अशी स्थिती उद्भवली नसल्याची कबुलीही दिली. गेल्याच आठवड्यात राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांनी, अमेरिकेने कोरोनावर विजय मिळविलेला नाही याची जाणीव करून दिली होती.

अमेरिकेतील कोरोनाच्या बळींची संख्या नऊ लाखांवर असू शकते - राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे सल्लागार अँथनी फॉसी यांचा दावा‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स ऍण्ड इव्हॅल्युएशन’ (आयएचएमई) या गटाने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात, जगभरात कोरोनाच्या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या सध्याच्या अधिकृत जाहीर नोंदीपेक्षा दुपटीहून अधिक असल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्यानुसार, कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत नऊ लाख, पाच हजार जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याचे सांगण्यात आले होते. फॉसी यांनी एका मुलाखतीत, अमेरिकेतील कोरोना बळींची संख्या या अंदाजाच्या जवळपास असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेतील कोरोनाच्या बळींची संख्या नऊ लाखांवर असू शकते - राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे सल्लागार अँथनी फॉसी यांचा दावाअमेरिकी यंत्रणांनी कोरोनाच्या बळींची संख्या मोजण्यात ढिलाई दाखविल्याचीही कबुली सल्लागार फॉसी यांनी दिली. त्याचवेळी काही वेळेस अभ्यासगटांनी तयार केलेली मॉडेल्स अचूक असू शकतात, असा दावाही केला. ‘आयएचएमई’ने वर्तविलेले भाकित कोरोनाची अभूतपूर्व व्याप्ती दाखविणारे असून जगाने गेल्या १०० वर्षात अशी परिस्थिती पाहिली नसल्याचेही फॉसी यांनी म्हटले आहे.

अमेरिकेत कोरोनाचे तीन कोटी, २७ लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून बळींची संख्या पाच लाख, ८१ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या काही आठवड्यात अमेरिकेतील कोरोना रुग्णांची टक्केवारी घसरत असल्याचे दिसून आले होते. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्षीय सल्लागारांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

leave a reply