पाकिस्तानी लष्कराचे विमान दुर्घटनाग्रस्त 

लाहोर – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील  गुजरात भागात पाकिस्तानी लष्कराचे लढाऊ विमान  कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. पूर्वनियोजित हवाई सरावा दरम्यान हा अपघात झाला, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये पाकिस्तानात लढाऊ विमान कोसळण्याची होण्याची ही पाचवी दुर्घटना आहे.

पाकिस्तानचे लष्करी विमान हवाई सराव करीत असताना ही दुर्घटना घडली. काही अंतरावर हे विमान कोसळले आणि यात या दोन वैमानिकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती लष्कराने दिली आहे. या अपघाताचे कारण कळू शकलेले नसून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या महिन्यातही  पाकिस्तानचे  एफ-१६ लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. याचा वीडियो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता.

leave a reply