आफ्रिकी देशांमध्येही चीनच्या विरोधात असंतोष – आफ्रिकन नागरिकांना चीनमध्ये मिळालेल्या अमानवी वागणुकीवर प्रतिक्रीया उमटली

हरारे/अदिस अबाबा – कोरोनाव्हायरसची साथ आलेली असताना, चीनने आपल्या देशातील आफ्रिकन नागरिकांना तिरस्कारपूर्ण वागणूक दिली होती. याच्या बातम्या आता उघड होऊ लागल्या आहेत. याचे पडसाद उमटले असून, आफ्रिकन देशांमध्ये चिनी नागरिकांची हकालपट्टी करा, अशी मागणी जोर पकडत आहे. आफ्रिकी जनतेमधील या चीनविरोधी भावनेचा फटका चीनला बसू शकतो. अमेरिकेने देखील चीनमध्ये आफ्रिकन वंशाच्या नागरिकांवर झालेल्या वांशिक भेदभावावर टीका केली आहे.

गेल्या आठवड्यात चीनच्या ग्वाँगझाऊ शहरात आफ्रिकी नागरिक तसेच पर्यटकांची बळजबरीने कोरोनाव्हायरसची चाचणी करण्यात आली. तसेच १४ दिवसांसाठी या आफ्रिकी नागरिकांना सक्तिच्या विलगिकरणात ठेवण्यात आले होते. तर चीनच्या इतर काही भागात आफ्रिकी नागरिकांना राहत्या घरातून बाहेर काढण्यात आले. या आफ्रिकी नागरिकांना येथील हॉटेल्स, लॉजिंग मालकांनीही आसरा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या आफ्रिकी नागरिकांना उघड्यावर रहावे लागत आहे. चीनमध्ये पाच नायजेरीयन नागरिक कोरोना संक्रमित आढळल्यानंतर चीनमधील हा वंशद्वेष उफाळून वर आल्याचे दिसत आहे.

‘या नरकातून आमची सुटका करा’, असे काही आफ्रिकी नागरिकांनी वीडियोतून जाहीर आवाहन केले होते. चीनमध्ये सरकारकडून आपल्या बांधवांवर होणार्‍या या अत्याचाराचा वीडियो तसेच बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आफ्रिकी देशांमध्ये रान पेटले आहे. नायजेरीयासह दक्षिण आफ्रिका, केनिया, युगांडा, घाना या देशांचे सरकार, माध्यमे आणि जनता चीनवर तुटून पडले आहेत. केनियाच्या संसदेने तर चीनने आमच्या देशातून चालते व्हावे, असे फटकारले असून आपल्या देशातील चीनच्या नागरिकांना पिटाळून लावा, अशी मागणी केनियातील नेते करीत आहेत.

तर नायजेरीयन नेत्याने चिनी राजदूतांना समन्स बजावून, ‘नायजेरीयन नागरिकांना मिळणारी वागणूक कदापि सहन केली जाणार

leave a reply