पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या अंतर्गत कारभारापासून दूर रहावे

- अफगाणी राष्ट्राध्यक्षांचा इशारा

काबुल – पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या अंतर्गत कारभारापासून दूर रहावे, असा सज्जड इशारा अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी दिला आहे. ‘अफगाणिस्तान अस्थिर बनला तर पाकिस्तान देखील अस्थिर होईल. जर पाकिस्तानात स्थैर्य हवे असेल तर त्यांना अफगाणिस्तान देखील स्थिर ठेवावाच लागेल. तेव्हा शत्रूत्व आणि मैत्री यापैकी एकाची निवड करण्याची वेळ पाकिस्तानसमोर आलेली आहे’, असे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी बजावले आहे.

आपल्या देशातील दहशतवादी हल्ल्यांसाठी आणि अस्थैर्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप अफगाणिस्तानचे नेते व सुरक्षा यंत्रणा करीत आहेत. तालिबानबरोबरच्या शांतीचर्चेच्या आडून पाकिस्तान पुन्हा एकदा आपल्या देशावर पकड मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ठपका अफगाणिस्तानने ठेवला आहे. तर पाकिस्तानने अफगाण सरकारचे हे आरोप फेटाळले आहेत.

 

leave a reply