पाकिस्तानमध्ये रेल्वे दुर्घटनेत 40 प्रवासी ठार

सिंध – सोमवारी पाकिस्तानच्या सिंध प्रांंतातील गोटकी जिल्ह्यात दोन एक्सप्रेस एकमेकांवर आदळून झालेल्या दुर्घटनेत 40 प्रवासी ठार झाले आहेत. तर 100 हून अधिकजण जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जाते. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून रेल्वेमंत्र्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पंतप्रधानांनी यंंत्रणांना या दुर्घटनेचा तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत.

40 प्रवासीसोमवारी सिंधच्या घोटकीमध्ये रेती आणि ओबारो रेल्वे स्थानकादरम्यान ‘मिलात एक्सप्रेस’ रुळावरुन घसरली आणि ती पलीकडच्या रुळावर उभ्या असणार्‍या ‘सर सायेद एक्सप्रेस’ वर आदळली. या दुर्घटनेत 40 जण ठार झाल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. पण अपघाताची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढू शकते.

दुर्घटनेनंतर तातडीने पाकिस्तानचे लष्कर आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर जवळच्याच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अद्याप अनेकजण ढिगार्‍याखाली अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी अवजड यंत्रणा मागविण्यात आली आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. याचा पाकिस्तानच्या रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे.

40 प्रवासीदरम्यान, गेल्या दशकभरात पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वे अपघात झाले आहेत. 2005 साली सिंधच्या गोंटकी जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातात 130 जण ठार झाले होते. तर 2019 साली पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रेल्वेला लागलेल्या आगीत 70 हून अधिक जण मृत पावले. तर 2020 साली सुक्कुर डिव्हिजनमध्ये धावती रेल्वे प्रवासी बसवर आदळली होती. या दुर्घटनेत 19 जण ठार झाले होते.

पाकिस्तानमध्ये रेल्वे रुळाची अवस्था दयनीय आहे. यामुळे रेल्वेचे अपघात होत असल्याचे एका तपासात स्पष्ट झाले होते. या दुर्घटनेमुळे ही समस्या पुन्हा?एकदा ऐरणीवर आली आहे.

leave a reply