पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन ‘एमक्यूएम’कडून ‘ब्लॅक डे’ म्हणून साजरा केला जाणार

लंडन – पाकिस्तानी लष्कराकडून केल्या जाणाऱ्या अन्वयित अत्याचाराविरोधात पाकिस्तानातील मुहाजिर, सिंधी, बलोच, पश्तून आणि इतर अल्पसंख्यांकानी १४ ऑगस्ट हा दिवस ‘ब्लॅक डे’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन ‘मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट'(एमक्यूएम)चे संस्थापक अल्ताफ हुसेन यांनी केले आहे. तसेच एमक्यूएम पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन ‘ब्लॅक डे’ म्हणून साजरा करणार आहे. त्यादिवशी एमक्यूएम पाकिस्तानच्या विरोधात ब्रिटन,अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर उतरून निदर्शने करणार असल्याचा इशारा अल्ताफ हुसेन यांनी दिला.

पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन 'एमक्यूएम'कडून 'ब्लॅक डे' म्हणून साजरा केला जाणारपाकिस्तानी लष्कराकडून पाकिस्तानातल्या मोहाजिर, सिंध, बलोच आणि पश्तून जनतेवर क्रूर अत्याचार केला जातो. पाकिस्तानी लष्कराकडून या समुदायांच्या नागरिकांचे अपहरण करुन हत्या करणे हे आता नेहमीचे झाले आहे. त्यामुळे या क्रूरतेविरोधात एमक्यूएम पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन ‘ब्लॅक डे’ म्हणून साजरा करणार आहे, असे अल्ताफ हुसेन यांनी म्हटले आहे.

एमक्यूएमतर्फे या दिवशी लंडन, अमेरिका, कॅनडा, जर्मनीमध्ये कार रॅलीज काढण्यात येणार आहे. नुकतीच एमक्यूएमची यासंदर्भात सभा पार पडली. या निदर्शनां’ची जोरदार तयारी सुरु आहे. या माध्यमातून पाकिस्तानी लष्कर करीत असलेला क्रूर अत्याचार जगासमोर येईल, असा दावा एमक्यूएमकडून केला जात आहे.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कर सिंध प्रांत ताब्यात घेण्यासाठी हालचाली वाढवित आहे, असे म्हटले होते. यातून पाकिस्तानला या प्रांतात लष्करी वसाहत स्थापन करायची आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारला कराची लष्कराच्या ताब्यात द्यायची आहे, असे आरोप अल्ताफ हुसेन यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.

leave a reply