फिलिपाईन्स जपानबरोबर लष्करी करारासाठी उत्सुक

लष्करी करारासाठी उत्सुकमनिला – ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात चीनबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फिलिपाईन्सने जपानबरोबर लष्करी करारासाठी उत्सुक असल्याचे जाहीर केले. यासाठी फिलिपाईन्सने ‘व्हिजिटिंग फोर्सेस ॲग्रीमेंट’ करण्याची तयारी दाखविली आहे. जपान व फिलिपाईन्समधील सदर करार साऊथ चायना सीवर हक्क सांगणाऱ्या चीनसाठी इशारा ठरतो, असे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. साऊथ चायना सीच्या क्षेत्रातील आपली सागरी हद्द तसेच द्वीपसमुहांवर चीनने ताबा घेतल्याचा आरोप फिलिपाईन्स करीत आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फिलिपाईन्सच्या बाजूने निकाल देऊन चीनला इथून माघार घेण्याची सूचना केली होती. पण आंतरराष्ट्रीय नियम व आदेशांना पायदळी तुडवणाऱ्या चीनने याकडे दुर्लक्ष करून फिलिपाईन्सच्या क्षेत्रातील घुसखोरी सुरूच ठेवली होती. त्यानंतर चीनच्या ५०० हून अधिक जहाजांच्या पथकाने फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीत घुसखोरी केली होती. तसेच फिलिपाईन्सच्या तटरक्षक दलाच्या जहाजांजवळून धोकादायक प्रवास केला होता. यामुळे या क्षेत्रात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर जपानने फिलिपाईन्सच्या नौदलाला सहाय्य करण्याची घोषणा केली होती.

या पार्श्वभूमीवर, फिलिपाईन्सने जपानबरोबर लष्करी करार करण्यासाठी पावले उचलली आहेत. सदर लष्करी सहकार्य कुठल्याही देशाला लक्ष्य करणारे नसेल, असे फिलिपाईन्सने म्हटले आहे. पण फिलिपाईन्सने थेट उल्लेख न करता चीनविरोधात जपानशी लष्करी सहकार्य वाढविण्याची तयारी करून चीनच्या वर्चस्ववादी धोरणांना प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे.

leave a reply