चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर फिलिपाईन्स दक्षिण कोरियाकडून दोन युद्धनौका खरेदी करणार

मनिला/बीजिंग – साऊथ चायना सीमधील चीनच्या वर्चस्ववादी कारवाया रोखण्यासाठी फिलिपाईन्सने दक्षिण कोरियाकडून दोन युद्धनौका खरेदी करण्याचा करार केला आहे. या दोन्ही युद्धनौका ‘अँटी शिप’ व ‘अँटी सबमरिन’ यंत्रणांनी सज्ज असतील व पुढील पाच वर्षात नौदलात दाखल होतील, अशी माहिती फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री डेल्फिन लॉरेंझना यांनी दिली. फिलिपाईन्स व दक्षिण कोरियामध्ये झालेला हा तिसरा संरक्षण करार आहे. यापूर्वी फिलिपाईन्सने दक्षिण कोरियाकडून दोन विनाशिका खरेदी केल्या असून, कोरियन नौदलाची एक युद्धनौकाही ‘रिफर्बिश्ड्’ करून विकत घेतली आहे.

चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर फिलिपाईन्स दक्षिण कोरियाकडून दोन युद्धनौका खरेदी करणारचीन व फिलिपाईन्समध्ये साऊथ चायना सीच्या मुद्यावर असणारा वाद चांगलाच चिघळत असल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्यात चीन व आसियनमध्ये झालेल्या बैठकीत फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी चीनला खडसावले होते. फिलिपाईन्स सरकार व लष्कराकडून साऊथ चायना सी प्रकरणात सातत्याने आग्रही भूमिका घेऊन चीनला सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. काही महिन्यांपूर्वी फिलिपाईन्सने चीनकडून दरवर्षी लादण्यात येणारी मासेमारीवरील बंदी उघडपणे धुडकावली होती. त्यापाठोपाठ फिलिपाईन्सने साऊथ चायना सीमध्ये कृत्रिम बेटे तसेच ‘मिलिटरी हब’ उभारण्याच्या हालचालीही सुरू केल्या होत्या.

दक्षिण कोरियाबरोबर केलेला नवा संरक्षणकरार याचाच पुढील टप्पा दिसत आहे. यापूर्वी फिलिपाईन्सने दक्षिण कोरियाबरोबर केलेल्या करारानुसार, ‘बीआरपी जोस रिझाल’ व ‘बीआरपी अँटोनिओ लुना’ या युद्धनौका नौदलात दाखल झाल्या आहेत. त्यानंतर पुढील वर्षी दक्षिण कोरियाच्या नौदलाने ‘डिकमिशन’ केलेली पोहांग क्लासमधील विनाशिका पुढील वर्षी फिलिपिनी नौदलात सामील होणार आहे. चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर फिलिपाईन्स दक्षिण कोरियाकडून दोन युद्धनौका खरेदी करणारत्यापाठोपाठ दोन नव्या विनाशिकांच्या खरेदीसाठी केलेला करार फिलिपाईन्सने स्वीकारलेल्या आक्रमक धोरणाचे संकेत देणारा ठरतो. युद्धनौकापाठोपाठ युरोपमधून हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती फिलिपिनी सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या ‘कॉंग्रेशनल रिसर्च सर्व्हिस’(सीआरएस) या अभ्यासगटाने चीनच्या आक्रमक कारवायांचा उल्लेख असणारा अहवाल संसदेला सादर केला आहे. ‘युएस-चायना स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिशन इन साऊथ ऍण्ड ईस्ट चायना सीज्: बॅकग्राऊंड ऍण्ड इश्यूज फॉर कॉंग्रेस’ असे या अहवालाचे नाव आहे. यात चीनकडून ‘साऊथ चायना सी’ व ‘ईस्ट चायना सी’ क्षेत्रावर वर्चस्व मिळविण्यासाठी ‘सलामी स्लायसिंग’ तसेच ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा वापर करण्यात येत असल्याचा ठपका ठेवला आहे.

leave a reply