पुतिन यांनी दिलेल्या वीजेच्या धक्क्याने जागतिकीकरणाची अखेर

मॉस्को – ‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्याच्या माध्यमातून जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला वीजेचा जबर धक्का दिला आहे. या धक्क्यामुळे नव्या बहुस्तंभीय जगाने आकार घेतला असून जागतिकीकरणाच्या टप्प्याची अखेर होण्यास सुरुवात झाली आहे’, असा दावा जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी केला.

पुतिन यांनी दिलेल्या वीजेच्या धक्क्याने जागतिकीकरणाची अखेर - जर्मनीचे चॅन्सेलर शोल्झ यांचा दावारशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनसुरक्षेला मोठा धक्का बसला असून त्याची जबर किंमत युरोपिय अर्थव्यवस्थांना मोजावी लागत असल्याचेही शोल्झ यांनी बजावले. जर्मनीसारख्या औद्योगिकीकरण झालेल्या देशाला याचा सर्वात मोठा फटका बसला असून सध्याचा काळा जर्मनीसमोर मोठ्या आव्हानाचा आहे, अशी कबुलीही शोल्झ यांनी दिली. गेली तीन दशके उत्तर अमेरिका व युरोपिय देशांनी चांगला विकास व महागाईतील घट यासह जागतिकीकरणाचे फायदे मिळविले होते, याकडेही शोल्झ यांनी लक्ष वेधले.

त्याचवेळी पुतिन यांना कोणत्याही परिस्थितीत युक्रेनमध्ये जिंकू देता कामा नये व ते हे युद्ध जिंकू शकणार नाही, असा आपला ठाम विश्वास असल्याचा दावाही जर्मन चॅन्सेलरनी केला.

leave a reply