पाकिस्तानातील क्वेट्टा दहशतवाद्यांचा प्रमुख तळ

- अफगाणिस्तानातील फ्रान्सच्या राजदूतांचा आरोप

काबुल/लंडन – ‘पाकिस्तानातील क्वेट्टा हा दहशतवाद्यांचा प्रमुख तळ आहे व सर्वांनाच ते ठाऊक आहे’, असा ठपका अफगाणिस्तानातील फ्रान्सचे राजदूत डेव्हिड मार्टिनन यांनी ठेवला. त्याचबरोबर तालिबानमार्फत होणार्‍या परकीय हस्तक्षेपाविरोधात अफगाणी नेते व जनतेने एकजुट दाखवावी, असे आवाहन करून मार्टिनन यांनी पाकिस्तानला टोला लगावला.

पाकिस्तानातील क्वेट्टा दहशतवाद्यांचा प्रमुख तळ - अफगाणिस्तानातील फ्रान्सच्या राजदूतांचा आरोपतालिबानला अफगाणिस्तानचा ताबा घेऊन आपली राजवट प्रस्थापित करायची आहे. त्यासाठी ते आपल्या बनावट मागण्या पुढे करून अफगाणी सरकारला गुंतविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप फ्रान्सच्या राजदूतांनी केला. अफगाणिस्तानच्या सरकारने या मागण्या मान्य करून हजारो तालिबानी कैद्यांची अजिबात सुटका करू नये, असे आवाहन मार्टिनन यांनी अफगाणी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले.

पाकिस्तानातील क्वेट्टा दहशतवाद्यांचा प्रमुख तळ - अफगाणिस्तानातील फ्रान्सच्या राजदूतांचा आरोपदरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब यांनी ब्रिटनचा दौरा करून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली. या भेटीमुळे इम्रान खान सरकारची बेचैनी वाढली असून शरीफ यांनी या भेटीची माहिती उघड करावी, अशी मागणी पाकिस्तानी सरकारने केली आहे.

गेल्या महिन्यात मोहिब यांनी पाकिस्तान दहशतवाद्यांचे वेश्यागृह असल्याची जळजळीत टीका केली होती. त्यावर पाकिस्तानातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

leave a reply