दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची रिझर्व्ह बँकेची घोषणा

- मात्र या नोटा अजूनही वैध असल्याचा खुलासा

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा माघारी घेण्याचा निर्णय घोषित केला. बँकांनी दोन हजार रुपयांच्या नोटांचे व्यवहार त्वरित थांबवावे. तसेच २३ मे पासून ते ३० सप्टेंबरपर्यंत बँकानी दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारून त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या चलनी नोटा द्याव्या, अशी सूचना रिझर्व्ह बँकेने केली. याचा अर्थ दोन हजार रुपयांची नोट बाद झाली असा होत नाही, अजूनही दोन हजार रुपयांची नोट वैधच आहे, असा खुलासाही रिझर्व्ह बँकेने केला. २०१८-१९ सालापासून दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद झाली होती. त्यामुळे सध्या व्यवहारात या नोटांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जात नाही, याकडे रिझर्व्ह बँकेने लक्ष वेधले आहे.

दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची रिझर्व्ह बँकेची घोषणा - मात्र या नोटा अजूनही वैध असल्याचा खुलासा२०१६ साली हजार व पाचशे रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. या काळात आधीच्या नोटा बँकांमधून बदली होईपर्यंतच्या काळात व्यवहारात गैरसोय होऊ नये, यासाठी दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा छापून रिझर्व्ह बँकेने त्या चलनात आणल्या होत्या. त्या काळाची आवश्यकता लक्षात घेऊन दोन हजार रुपयांची नोट छापण्याचा निर्णय झाला. पण २०१८-१९ सालापासून दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. सध्या वापरात असलेल्या ८९ टक्के इतक्या दोन हजार रुपयांच्या नोटा मार्च २०१७ च्या आधी छापलेल्या आहेत. या नोटांचा अवधी संपत आला होता, अशी माहितीही या निमित्ताने रिझर्व्ह बँकेने दिली.

दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची रिझर्व्ह बँकेची घोषणा - मात्र या नोटा अजूनही वैध असल्याचा खुलासासध्याच्या काळात दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर कमी झालेला आहे, ही बाब देखील रिझर्व्ह बँकेने लक्षात आणून दिली. २०१८ सालात देशामध्ये ६.७३ लाख कोटी इतक्या मुल्याच्या अर्थात ३७.३ टक्के इतक्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात होत्या. पण ३१ मार्च २०२३ पर्यंत हे प्रमाण ३.६२ लाख कोटींपर्यंत अर्थात १०.८ टक्क्यांपर्यंत कमी झालेले आहे, असे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे. यामुळे सदर नोटा मागे घेण्यात आल्यानंतर व्यवहारावर फार मोठा परिणाम होण्याची शक्यता नसल्याचा निर्वाळा रिझर्व्ह बँकेने दिला आहे.

२३ मे पासून बँका प्रत्येकी २० हजार रुपयांपर्यंतच्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देऊ शकतील आणि या नोटांमध्ये डिपॉझिट देखील स्वीकारू शकतील, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या सूचनेत म्हटले आहे.

हिंदी

 

leave a reply