चीनकडून होणाऱ्या तीव्र विरोधानंतरही अमेरिका व तैवानमध्ये व्यापारी कराराला मान्यता

वॉशिंग्टन/तैपेई/बीजिंग – चीनकडून अमेरिका-तैवानमधील वाढत्या सहकार्याला सातत्याने विरोध होत असतानाही दोन्ही देशांनी व्यापारी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका व तैवान या दोन्ही देशांनी पहिल्या द्विपक्षीय व्यापारी कराराला मान्यता दिली असून लवकरच त्यावर स्वाक्षऱ्या होतील, अशी माहिती अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कॅथरीन ताई यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने तैवानला ५० कोटी डॉलर्सच्या शस्त्रपुरवठ्याची घोषणा करून सदर प्रक्रिया ‘फास्ट ट्रॅक’ करण्याचे संकेत दिले होते.

चीनकडून होणाऱ्या तीव्र विरोधानंतरही अमेरिका व तैवानमध्ये व्यापारी कराराला मान्यतागेल्या वर्षी जून महिन्यात अमेरिका व तैवानने ‘युएस-तैवान इनिशिएटिव्ह ऑन २१स्ट सेंच्युरी ट्रेड’ची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांमध्येच दोन देशांच्या व्यापार प्रतिनिधींमध्ये चर्चेला सुरुवातही झाली होती. या प्रकरणात अमेरिकेने वेगवान हालचाली सुरू केल्याने चीनकडून त्यावर आक्रमक प्रतिक्रिया उमटली होती. तैवानशी अधिकृत पातळीवर सहकार्य स्थापन करण्याचे प्रयत्न झाल्यास त्याचे परिणाम अमेरिका-चीन संबंधांवर होतील, असे चीनने बजावले होते.

मात्र त्यानंतरही अमेरिका व तैवानच्या प्रतिनिधींनी व्यापारी मुद्यांवरील चर्चा सुरू ठेवली होती. अमेरिकेच्या काही शिष्टमंडळांनी तैवानचा दौराही केला होता. चीनकडून होणाऱ्या तीव्र विरोधानंतरही अमेरिका व तैवानमध्ये व्यापारी कराराला मान्यताया पार्श्वभूमीवर चर्चेला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दोन्ही देशांनी व्यापारी करारासंदर्भात घोषणा करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कॅथरीन ताई यांनी गुरुवारी याची घोषणा करताना, सदर करार अमेरिका-तैवान आर्थिक संबंधांमधील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.

गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, पहिल्या द्विपक्षीय व्यापारी करारात ‘कस्टम्स ॲडमिनिस्ट्रेशन ॲण्ड ट्रेड फॅसिलिटेशन’सह ‘रेग्युलेटरी प्रॅक्टिसेस’, ‘अँटीकरप्शन’ आणि छोट्या व मध्यम गटातील उद्योगांशी संबंधित तरतुदींचा समावेश आहे. सदर करार अमेरिका व तैवानमधील व्यापक व्यापारी कराराचा पहिला भाग असल्याचे सांगण्यात येते. या करारामुळे अमेरिकी उद्योजक व कंपन्यांना तैवानमध्ये अधिकाधिक उत्पादने निर्यात करण्यात सहाय्य होईल, अशी माहिती अमेरिकी सूत्रांनी दिली.

चीनकडून होणाऱ्या तीव्र विरोधानंतरही अमेरिका व तैवानमध्ये व्यापारी कराराला मान्यताचीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून तैवानविरोधात आक्रमक कारवाया सुरू असून त्यात लष्करी व राजनैतिक पातळीसह आर्थिक क्षेत्राचाही समावेश आहे. चीनच्या या हालचाली लक्षात घेऊन अमेरिका व युरोपिय देशांसह मित्रदेशांनी तैवानबरोबरील व्यापारी सहकार्य वाढविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रासह तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावर अधिक भर देण्यात आल्याचे समोर आले आहे. तैवानची आर्थिक कोंडी करण्याचे चीनचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, यासाठी पावले उचलली जात आहेत.

अमेरिकेपाठोपाठ युरोपिय देशांमधूनही तैवानबरोबर व्यापारी तसेच गुंतवणूक करार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

हिंदी

 

leave a reply