‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मुळे यापुढे आधीसारखी भरती होणार नाही

- तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘आयबीएम’च्या प्रमुखांची घोषणा

वॉशिंग्टन – तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी ‘आयबीएम’ने नजिकच्या काळात कर्मचाऱ्यांची भरती थांबविण्याचे जाहीर केले आहे. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ अर्थात ‘एआय’ हे तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांची जागा घेईल, अशी माहिती कंपनीचे प्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच गोल्डमन सॅक्स या कंपनीने, ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे ३० कोटी जणांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ ओढवू शकते, असा इशारा दिला होता.

‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मुळे यापुढे आधीसारखी भरती होणार नाही - तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘आयबीएम’च्या प्रमुखांची घोषणाब्लूमबर्ग न्यूज या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ‘आयबीएम’चे प्रमुख अरविंद कृष्णा यांनी, कंपनीकडून कर्मचारी भरतीची प्रक्रिया हळुहळू थांबविण्यात येईल व ‘बॅक ऑफिस’मधील कामांसाठी प्रक्रिया थांबविण्याच्या योजनेपासून याची सुरुवात केली जाईल, असे अरविंद कृष्णा यांनी स्पष्ट केले. सध्या ‘आयबीएम’मध्ये एकूण २,८८,००० कर्मचारी कार्यरत असून कंपनीचे जाळे १७५हून अधिक देशांमध्ये पसरले आहे. यातील ‘बॅक ऑफिस फंक्शन्स’साठीच्या सुमारे २५ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आर्टिफिशल तंत्रज्ञान व ‘ऑटोमेशन’च्या वापरामुळे बॅक ऑफिसमधील जवळपास ३० टक्के कर्मचारी कमी होतील. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मुळे यापुढे आधीसारखी भरती होणार नाही - तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘आयबीएम’च्या प्रमुखांची घोषणापुढील पाच वर्षात ही प्रक्रिया पार पडेल, असे ‘आयबीएम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा यांनी सांगितले. सध्या कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार नाही, मात्र जे कर्मचारी सोडून जातील अथवा इतर कारणांमुळे कमी होतील त्यांची जागा घेण्यासाठी नव्या कर्मचाऱ्यांची भरती करणार नाही, अशा शब्दात ‘आयबीएम’च्या प्रवक्त्यांनी ‘एआय’च्या वापराला दुजोरा दिला.

गेल्या काही वर्षात आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या वापराबाबत विविध स्तरावरून गंभीर इशारे दिले जात आहेत. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मुळे यापुढे आधीसारखी भरती होणार नाही - तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘आयबीएम’च्या प्रमुखांची घोषणाकाही दिवसांपूर्वीच ‘जनरेटिव्ह एआय’ विकसित करणारे संशोधक जॉफ्रे हिन्टन यांनी, त्याचा वापर विघातक प्रवृत्ती असलेल्यांकडून केला जाऊ शकतो, असे बजावले होते. जगातील आघाडीच्या देशांचा गट ‘जी७’मध्येही एआयच्या वापरासंदर्भातील पारदर्शकता व नियमांच्या मुद्यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समोर आले होते.

मार्च महिन्याच्या अखेरीस गोल्डमन सॅक्स या आघाडीच्या कंपनीने आर्टिफिशल इंटेलिजन्समुळे प्रचंड मोठ्या बेकारीला तोंड द्यावे लागेल, अशी भीती व्यक्त केली होती. अमेरिका व युरोपातील जवळपास दोन तृतियांश नोकऱ्यांवर एआय तंत्रज्ञानाचा प्रभाव पडेल, असे भाकित गोल्डमन सॅक्सने आपल्या अहवालात वर्तविले आहे.

हिंदी English

 

leave a reply