सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर १९ रॉकेट हल्ले

- इराणसंलग्न गटांकडून अमेरिकेला प्रत्युत्तराचा इशारा

कैरो/बैरूत – अमेरिकेने सिरियातील इराणच्या ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्याला चोवीस तासही उलटले नाही तोच अमेरिकेच्या लष्करी तळांवर नवे हल्ले झाले. सलग दुसऱ्या दिवशी सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर किमान १९ रॉकेट्सचे हल्ले झाले. यामध्ये अमेरिकेचा जवान तसेच चार नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या रॉकेट हल्ल्यांना अमेरिकेकडून जोरदार उत्तर अपेक्षित असलेल्या इराणसंलग्न दहशतवादी संघटनेने अमेरिकेला अधिक जोरदार प्रत्युत्तराचा इशारा दिला आहे. त्यामुळे अवघ्या काही तासात सिरियामध्ये संघर्षस्थिती निर्माण झाली आहे.

सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर १९ रॉकेट हल्ले - इराणसंलग्न गटांकडून अमेरिकेला प्रत्युत्तराचा इशाराशुक्रवारी उशीरा सिरियाच्या ईशान्येकडील कोनोको तळावर आठ रॉकेट्सचे हल्ले झाले. यामध्ये अमेरिकेच्या लष्कराचा एक जवान जखमी झाला. त्याचबरोबर या तळाच्या दिशेने ड्रोन्सचे हल्लेही झाले. पण अमेरिकेच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने तीन पैकी दोन ड्रोन्स उद्ध्वस्त केले, अशी बातमी अरब वृत्तवाहिनीने दिली. तर शुक्रवारी सकाळी सिरियातील ‘ग्रीन व्हिलेज’ येथील अमेरिका व मित्रदेशांच्या लष्करी तळाला १० रॉकेट्सनी लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नाही. पण पाच किलोमीटर अंतरावर कोसळलेल्या रॉकेटच्या स्फोटात चार नागरिक जखमी झाले. यामध्ये दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश असल्याची माहिती अमेरिकेच्या ‘सेंटकॉम’ने दिली.

सलग दुसऱ्या दिवशी सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर झालेल्या या रॉकेट हल्ल्यांमुळे या क्षेत्रातील तणाव वाढला आहे. सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर १९ रॉकेट हल्ले - इराणसंलग्न गटांकडून अमेरिकेला प्रत्युत्तराचा इशारायाआधी गुरुवारच्या ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिकेने सिरियातील इराणच्या तीन ठिकाणांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यांमध्ये इराणसंलग्न १९ दहशतवाद्यांचा बळी गेल्याची माहिती ब्रिटनस्थित सिरियातील मानवाधिकार संघटनेने दिली. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेने सिरियातील इराणसंलग्न गटाच्या दहशतवाद्यांवर केलेली ही मोठी कारवाई ठरते, असा दावा या मानवाधिकार संघटनेने केला आहे. या हल्ल्यांशी आपला काहीही संबंध नसल्याचे इराणने म्हटले होते.

पण सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी अमेरिकेच्या लष्करी तळांवरील नव्या हल्ल्यानंतर आपल्या समर्थकांसाठी अलर्ट जारी केला आहे. नव्या रॉकेट हल्ल्यांमध्ये अमेरिकेचा जवान जखमी झाल्यानंतर सिरियातील इराणसंलग्न गटांनी अमेरिकेच्या नव्या हवाई हल्ल्यांसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर १९ रॉकेट हल्ले - इराणसंलग्न गटांकडून अमेरिकेला प्रत्युत्तराचा इशारातसेच अमेरिकेने आपल्यावर हवाई हल्ला चढविलाच तर त्याला जोरदार प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा दिला आहे. इराणसंलग्न दहशतवादी संघटनेच्या या इशाऱ्यामुळे सिरियातील संघर्ष नव्याने पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर झालेल्या हल्ल्यांमागे इराणची रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स असल्याचा दावा अमेरिकेतील काही विश्लेषक करीत आहेत. अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ल्यासाठी वापरलेले ड्रोन देखील इराणी बनावटीचे होते. त्यामुळे अमेरिकेच्या जवानांच्या सुरक्षेला इराणकडून धोका असल्याचे या हल्ल्यांमधून उघड होत असल्याचे हे विश्लेषक बजावत आहेत.

अमेरिकेकडून इराणला जशास तसे उत्तर मिळेल – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन

ओटावा – ‘अमेरिकेला इराणबरोबर कुठल्याही प्रकारे संघर्ष करायचा नाही. पण आपल्या जनतेच्या सुरक्षेसाठी अमेरिका सज्ज आहे. अमेरिकेच्या लष्करी तळांवरील हल्ल्यांना जशास तसे उत्तर मिळेल’, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला. अमेरिकेच्या लष्करी तळांवरील हल्ल्यांना उत्तर देण्याची लष्कराला परवानगी दिल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात कंत्राटदार ठार झाला तर अमेरिकेचे पाच जवान जखमी झाले होते. यानंतर खवळलेल्या अमेरिकेने सिरियातील इराणच्या तीन ठिकाणांवर हल्ले चढविले होते. इराणने सिरियात तयार केलेले शस्त्रास्त्रांचे गोदाम आणि शस्त्रतस्करीचा भुयारीमार्ग यात उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला जातो. अमेरिकेच्या या कारवाईमुळे इराणसंलग्न दहशतवादी संघटनांचे जबर नुकसान झाले होते. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या आदेशानंतर ही कारवाई केल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी म्हटले होते.

काही तासानंतर शुक्रवारी कॅनडात दाखल झालेल्या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सिरियातील अमेरिकेच्या हवाई हल्ल्याची माहिती दिली. तसेच या कारवाईसाठी इराणला जशास तसे उत्तर मिळेल, असा इशाराही दिला.

हिंदी

 

leave a reply