सोव्हिएत मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी रशिया अफगाणिस्तानात सैन्य रवाना करू शकतो

- रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह

मॉस्को – अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात मुसंडी मारणार्‍या तालिबानने ताजिकिस्तानच्या दोन तृतियांश सीमेचा ताबा घेतला आहे. तालिबानच्या हल्ल्यांमुळे ताजिक सीमेवर निर्माण झालेल्या तणावावर रशियाने तीव्र चिंता व्यक्त केली. ‘आपल्या सोव्हिएत देशांच्या सुरक्षेसाठी रशिया ताजिकिस्तानमधील तळाचा वापर करील. तशीच आवश्यकता असेल तर रशिया अफगाणिस्तानात लष्करही रवाना करील’, असा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील मोहिमेत अपयशी ठरल्यामुळेच अमेरिका माघार घेत असल्याचा ठपका रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी ठेवला.

सोव्हिएत मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी रशिया अफगाणिस्तानात सैन्य रवाना करू शकतो - रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्हगेल्या आठवड्याभरापासून तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागात जोरदार हल्ले चढविले आहेत. तालिबानच्या हल्ल्यांमुळे किमान दीड हजार अफगाणी जवानांनी सीमा ओलांडून ताजिकिस्तान, उझबेकिस्तान या देशांमध्ये आश्रयासाठी धाव घेतल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले होते. अफगाणी जवानांच्या या पलायनामुळे उत्तरेकडील बर्‍याच सीमाचौक्यांवर तालिबानने आपले नियंत्रण मिळविले होते. तालिबानच्या या कारवाईवर रशियाने संताप व्यक्त केला.

‘आपल्या मित्रदेशांच्या सीमेजवळ सुरू असलेल्या धोकादायक हालचाली रोखण्यासाठी रशिया काहीही करू शकतो. यासाठी रशिया ताजिकिस्तानमधील आपल्या लष्करी तळाचा वापर करू शकतो’, असे सांगून रशियन परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी अफगाणिस्तानात हवाई हल्ल्याचे संकेत दिले. सोव्हिएत मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी रशिया अफगाणिस्तानात सैन्य रवाना करू शकतो - रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्हएका कार्यक्रमात, रशिया पुन्हा अफगाणिस्तानात सैन्य रवाना करील का?, असा प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी याचे उत्तर स्पष्ट आहे, असे सांगून अफगाणिस्तानात लष्करी कारवाईचे संकेत दिले.

त्याचबरोबर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ताजिकिस्तान व उझबेकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांबरोबर चर्चा केल्याची माहिती लॅव्हरोव्ह यांनी दिली. सोव्हिएत मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी रशिया अफगाणिस्तानात सैन्य रवाना करू शकतो - रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्हआपल्या मध्य आशियाई मित्रदेशांची सुरक्षा धोक्यात आली तर, ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन-सीएसटीओ’ अर्थात रशिया व सोव्हिएत देशांची नाटोसदृश्य लष्करी संघटना पुढील कारवाईला तयार असेल, असे लॅव्हरोव्ह म्हणाले.

दरम्यान, रशियाने दिलेल्या या इशार्‍याला काही तास उलटत नाही तोच, तालिबानच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी रशियाचा दौरा केला. या दौर्‍यात तालिबानच्या प्रतिनिधींनी अफगाणिस्तानबाबतची आपली भूमिका मांडली. सध्या अफगाणिस्तानच्या 85 टक्के भागावर आपला ताबा असल्याचा दावा तालिबानने केला. पण अफगाणिस्तानचा वापर रशियाविरोधी कारवाईसाठी केला जाणार नसल्याचे आश्‍वासन तालिबानने रशियाला दिले.

leave a reply