रशिया अमेरिकेची क्षेपणास्त्रे इराणकडे रिव्हर्स इंजिनिअरिंगसाठी पाठवित आहे

- अमेरिकन वृत्तवाहिनीचा दावा

वॉशिंग्टन – युक्रेनच्या युद्धात रशियन लष्कराच्या हाती सापडलेली अमेरिका व नाटोची क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रास्त्रे रशिया इराणकडे रवाना करीत आहे. इराणने या शस्त्रास्त्रांची रिव्हर्स इंजिनिअरिंग करावी, यासाठी रशिया इराणला ही शस्त्रास्त्रे पुरवित आहे. यामध्ये रणगाडाभेदी जॅव्हलिन आणि स्टिंगर्स ही विमानभेदी यंत्रणा असल्याचा दावा अमेरिकेच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने केला.

रशिया अमेरिकेची क्षेपणास्त्रे इराणकडे रिव्हर्स इंजिनिअरिंगसाठी पाठवित आहे - अमेरिकन वृत्तवाहिनीचा दावारशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या युद्धात अमेरिका, नाटो व मित्रदेशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात लष्करी सहाय्य पुरविले आहे. अमेरिकेच्या दबावानंतर नाटो सदस्य देशांनी युक्रेनसाठी शस्त्रास्त्रे रवाना केली आहेत. यामुळे येत्या काळात आपल्या देशावर हल्ला झालाच तर आठवडाभर देखील पुरणार नाही, इतकाच शस्त्रसाठा असल्याचा इशारा युरोपिय देश देत आहेत.

पण अमेरिका व नाटोने युक्रेनला पुरविलेल्या या शस्त्रास्त्रांपैकी काही शस्त्रे रशियाच्या हाती पडली आहेत. यामध्ये जॅव्हलिन व स्टिंगर्सचा समावेश असल्याची माहिती अमेरिकन वृत्तवाहिनीने दिली.

इराणने अमेरिका व नाटोच्या या शस्त्रास्त्रांची रिव्हर्स इंजिनिअरिंग करावी आणि या शस्त्रास्त्रांची नवी आवृत्ती तयार करावी, यासाठी रशिया इराणला सहाय्य करीत असल्याचा ठपका अमेरिकन वृत्तवाहिनीने ठेवला. यावर रशियाकडून प्रतिक्रिया आलेली नाही.

leave a reply