तैवानच्या क्षेत्रातील स्थैर्य जपान व आंतरराष्ट्रीय स्थैर्यासाठी अत्यावश्यक

- जपानच्या संरक्षण मंत्रालयाच्या ‘व्हाईट पेपर’चा दावा

टोकिओ – जपानच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी ‘व्हाईट पेपर’ अर्थात श्‍वेतपत्रक प्रसिद्ध केले. जपानच्या सरकारने यामार्फत पहिल्यांदाच तैवानच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून थेट चीनला धक्का दिला आहे. ‘तैवानच्या सुरक्षेला आव्हान देणार्‍या चीनच्या लष्करी हालचाली धोकादायक आहेत. तैवानच्या क्षेत्रात स्थैर्य निर्माण करणे जपानच्या सुरक्षेबरोबरच आंतरराष्ट्रीय स्थैर्यासाठी आवश्यक आहे’, अशा शब्दात जपानने तैवानच्या सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले.

तैवानच्या क्षेत्रातील स्थैर्य जपान व आंतरराष्ट्रीय स्थैर्यासाठी अत्यावश्यक- जपानच्या संरक्षण मंत्रालयाच्या ‘व्हाईट पेपर’चा दावागेल्या काही वर्षांमध्ये जपानच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध केला जाणारा व्हाईट पेपर संरक्षण सज्जता वाढविण्यावर भर देत आहे. चीन अधिकार सांगत असलेल्या सेंकाकू द्विपसमुहाच्या सुरक्षेसाठी जपानने आपली लष्करी सज्जता वाढविण्याचे धोरण जपानने गेल्या काही वर्षांपासून स्वीकारले होते. यावर चीनने वेळोवेळी आपला आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे यंदाच्या जपानच्या व्हाईट पेपरकडे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांच्या नजरा लागल्या होत्या.

जपानचे पंतप्रधान होशिहिदे सुगा यांनी संमत केलेला व्हाईट पेपर मंगळवारी प्रसिद्ध झाला. यामध्ये अमेरिका-चीनमधील आर्थिक व व्यापारी संघर्ष, साऊथ चायना सीच्या क्षेत्रातील तणाव आणि तैवानच्या सुरक्षेचा मुद्दा जपानच्या संरक्षण मंत्रालयाने ठळकपणे मांडला. तैवानच्या हवाई हद्दीत चीनच्या लढाऊ विमानांच्या घुसखोरीचा उल्लेख जपानच्या व्हाईट पेपरमध्ये आहे.तैवानच्या क्षेत्रातील स्थैर्य जपान व आंतरराष्ट्रीय स्थैर्यासाठी अत्यावश्यक- जपानच्या संरक्षण मंत्रालयाच्या ‘व्हाईट पेपर’चा दावा

चीनच्या लष्करी सामर्थ्यात होत असलेली वाढ तसेच अमेरिका-चीनमधील लष्करी असमतोल हा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता व स्थैर्यावर परिणाम करणारा ठरत आहे’, अशी चिंता यात व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर ‘साऊथ चायना सी आणि तैवानच्या क्षेत्रातील अमेरिका आणि चीनमधील लष्करी हालचालींवर बारीक नजर ठेवणे आवश्यक आहे’, असेही यात नमूद करण्यात आले आहे. ‘तैवानच्या सुरक्षेला आव्हान देणार्‍या चीनच्या लष्करी हालचाली धोकादायक ठरतात. तैवानच्या क्षेत्रात स्थैर्य निर्माण करणे जपानच्या सुरक्षेबरोबरच आंतरराष्ट्रीय स्थैर्यासाठीही तितकेच आवश्यक आहे’, असे सांगून तैवानची सुरक्षा आपल्या देशाशी जोडलेली असल्याचे जपानने पुन्हा एकदा स्पष्ट केले. गेल्याच आठवड्यात जपानचे उपपंतप्रधान तारो आसो यांनी येत्या काळात तैवानवर हल्ला झाला तर त्यापासून जपानच्या सुरक्षेलाही धोका संभवेल, असे बजावले होते. त्यामुळे तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिकेसह जपान देखील युद्धात उडी घेईल, असे तारो आसो यांनी जाहीर केले होते.

leave a reply