इस्रायलबरोबरील सहकार्यामुळे दहशतवादविरोधी मोहिमेत यश

- सुदानच्या लष्करप्रमुखांचा दावा

खार्तुम – इस्रायलबरोबरील सहकार्य वाढत असल्याने सुदानला दहशतवादविरोधी मोहिमेत मोठे यश मिळत आहे, असा दावा सुदानचे लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह बुर्‍हान यांनी केला. सुदानने २०२०च्या अखेरीस युएई व बाहरिन यांच्याप्रमाणे इस्रायलबरोबर अब्राहम करार करून सहकार्य प्रस्थापित केले होते. त्यानंतर सुदानमध्ये लष्कराने बंड करून लोकनियुक्त सरकार उलथले होते. लष्कराच्या या कारवाईविरोधात सुदानमध्ये निदर्शने सुरू असून त्यामागे परकीय हात असल्याचे दावे लष्कराकडून करण्यात आले आहेत.

इस्रायलबरोबरील सहकार्यामुळे दहशतवादविरोधी मोहिमेत यश - सुदानच्या लष्करप्रमुखांचा दावासुदान हा एकेकाळी इस्रायलचा कट्टर शत्रूदेश म्हणून ओळखण्यात येत होता. मात्र अब्राहम करारानंतर दोन देशांमधील सहकार्य मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे. संरक्षण तसेच गोपनीय माहितीची देवाणघेवाण या क्षेत्रात इस्रायलकडून सुदानला मोठे सहाय्य पुरविण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यात सुदानी लष्करी अधिकार्‍यांनी अनेकदा इस्रायलला भेट दिल्याचेही समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर, लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह बुर्‍हान यांनी केलेला दावा महत्त्वाचा ठरतो.

इस्रायलबरोबरील सहकार्यामुळे दहशतवादविरोधी मोहिमेत यश - सुदानच्या लष्करप्रमुखांचा दावाजानेवारी महिन्यात इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोस्सादच्या पथकाने सुदानला भेट दिली होती. त्यानंतर इस्रायलच्या लष्करी अधिकार्‍यांनीही सुदानचा दौरा केला होता. सुदानच्या लष्करप्रमुखांनी देशातील दहशतवादविरोधी मोहिमेला मिळालेल्या यशाबद्दल केलेला दावा व या भेटी लक्ष वेधून घेणार्‍या ठरत आहेत. इस्रायलच्या सहकार्याबद्दल बोलतानाच जनरल बुर्‍हान यांनी आपण अमेरिका व इतर देशांकडून लादण्यात येणार्‍या संभाव्य निर्बंधांना घाबरत नसल्याचाही दावा केला. अमेरिकेला सुदानबद्दल चुकीची माहिती देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

leave a reply