दीड वर्षांपूर्वी काबुलमध्ये स्फोट घडविणाऱ्या ‘आयएस’च्या सूत्रधाराला तालिबानने ठार केले

- व्हाईट हाऊस व पेंटॅगॉनची माहिती

वॉशिंग्टन – काबुल विमानतळावर आत्मघाती स्फोट घडवून १८३ जणांचा बळी घेणाऱ्या ‘आयएस’च्या मास्टरमाईंडला तालिबानने ठार केले. या कारवाईत अमेरिकेचे लष्कर कुठल्याही सहभागी झाले नव्हते, अशी माहिती व्हाईट हाऊस आणि पेंटॅगॉनने दिली. दीड वर्षांपूर्वी काबुलमध्ये झालेल्या स्फोटातील बळींमध्ये अमेरिकेच्या १३ जवानांचाही समावेश होता. त्यामुळे अमेरिकेने ही बातमी उचलून धरल्याचे दिसत आहे.

दीड वर्षांपूर्वी काबुलमध्ये स्फोट घडविणाऱ्या ‘आयएस’च्या सूत्रधाराला तालिबानने ठार केले - व्हाईट हाऊस व पेंटॅगॉनची माहिती१४ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानने राजधानी काबुलचा ताबा घेतला. कतारची राजधानी दोहा येथे झालेल्या करारानुसार ३० ऑगस्टपर्यंत अमेरिका व मित्रदेशांचे लष्कर अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घेणार होते. तालिबानची राजवट परतल्यामुळे घाबरलेल्या अफगाणी जनतेने काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी गर्दी केली होती. परदेशी लष्करी विमानांना लटकून अफगाणींनी जीव गमावल्याचे व्हिडिओज्‌‍ समोर आले होते. काबुल विमानतळावर ही पळापळ सुरू असताना २६ ऑगस्ट रोजी येथील मुख्य द्वाराजवळ मोठा आत्मघाती स्फोट झाला.

या स्फोटात १७० अफगाणींचा तर १३ अमेरिकी जवानांचा बळी गेला. ‘आयएस-खोरासन’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या स्फोटाचे अमेरिकेत तीव्र पडसाद उमटले होते. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर जोरदार टीकाही झाली होती. पुढच्या काही दिवसात अमेरिकेने राजधानी काबुलमध्ये ड्रोन हल्ला चढवून विमानतळावरील स्फोटाच्या सूत्रधाराला ठार केल्याची घोषणा केली होती. दीड वर्षांपूर्वी काबुलमध्ये स्फोट घडविणाऱ्या ‘आयएस’च्या सूत्रधाराला तालिबानने ठार केले - व्हाईट हाऊस व पेंटॅगॉनची माहितीपण अमेरिकेच्या या ड्रोन हल्ल्यात आयएसचे दहशतवादी नाही तर स्थानिक अफगाणी ठार झाल्याचे उघड झाल्यानंतर अमेरिकेला आपली चूक कबुल करावी लागली होती.

त्यानंतर बायडेन प्रशासनाने तालिबानच्या राजवटीवर जोरदार टीका सुरू ठेवली आहे. तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानातील आयएसचा प्रभाव वाढत असल्याचे आरोप केले. तसेच तालिबान आयएस व इतर दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करीत नसल्याचे ताशेरे अमेरिकेने ओढले होते. तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान पुन्हा दहशतवादाचे केंद्र ठरत असून पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांसाठी देखील अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणे जबाबदार असल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला होता. त्याचबरोबर या दहशतवादी ठिकाणांवर कारवाई करण्यासाठी अफगाणिस्तानात ड्रोन हल्ले चढविण्याचे संकेत अमेरिकेने दिले होते.

दीड वर्षांपूर्वी काबुलमध्ये स्फोट घडविणाऱ्या ‘आयएस’च्या सूत्रधाराला तालिबानने ठार केले - व्हाईट हाऊस व पेंटॅगॉनची माहितीअशा परिस्थितीत, व्हाईट हाऊस व अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने दीड वर्षापूर्वीच्या काबुल विमानतळ स्फोटाबाबतची महत्त्वाची घोषणा केली. या आत्मघाती स्फोटाचा सूत्रधार असलेल्या आयएस-खोरासानच्या मुख्य कमांडरला तालिबानने ठार केले. या महिन्याच्या सुरुवातीला तालिबानने या दहशतवाद्याचा खातमा केल्याची माहिती पेंटॅगॉनचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल पॅट्रिक रायडर यांनी दिली. पण व्हाईट हाऊस किंवा पेंटॅगॉनने आयएसच्या दहशतवाद्याचे नाव उघड करण्याचे टाळले. तालिबानने तर या प्रकरणी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

काबुल विमानतळावरील आत्मघाती स्फोटात ठार झालेल्या अमेरिकन जवानांच्या कुटुंबियांनी व्हाईट हाऊसच्या या घोषणेवर टीका केली. दहशतवाद्याचे नाव आणि यासंबंधीचे तपशील जाहीर करण्यात व्हाईट हाऊसला कोणती अडचण आहे, असा सवाल डॅरीन हुवर या पीडित वडिलांनी केला. आयएसचा सूत्रधार ठार झाल्यामुळे काबुल विमानतळावरील आत्मघाती स्फोटाप्रकरणी बायडेन प्रशासन किंवा पेंटॅगॉन दोषमुक्त होत नाही, अशी जहरी टीका हुवर यांनी केली.

leave a reply