‘६जी’ तंत्रज्ञानावर काम सुरू करण्याचे दूरसंचार सचिवांचे ‘सी-डॉट’ला निर्देश

- क्वांटम कम्युनिकेशन प्रयोगशाळेचे उद्घाटन

नवी दिल्ली – देशात अजून ‘५जी’ तंत्रज्ञान लॉन्च झालेले नाही. नुकत्याच या तंत्रज्ञानाच्या चाचण्या पार पडल्या होत्या. लवकरच देशात ‘५जी’ सेवा सुरू होईल, अशी शक्यता आहे. मात्र ‘५जी’ सेवा सुरू होण्याआधी भविष्याचा विचार करून ‘६जी’ तंत्रज्ञानावर काम सुरू करण्याचे निर्देश दूरसंचार सचिव के. राजारमन यांनी सरकारची दूरसंचार संशोधन आणि विकास संस्था ‘सी-डॉट’ला दिले आहेत. दूरसंचार सचिव के. राजारमन यांनी रविवारी ‘क्वांटम कम्युनिकेशन प्रयोगशाळेचे’ उद्घाटन केले. तसेच ‘सी-डॉट’द्वारे विकसित केलेल्या क्वांटम की डिस्ट्रीब्युशन (क्यूकेडी) तंत्रज्ञानाचेही अनावरण केले. त्यावेळ त्यांनी ‘सी-डॉट’ला या सूचना दिल्या.

‘६जी’ तंत्रज्ञानावर काम सुरू करण्याचे दूरसंचार सचिवांचे ‘सी-डॉट’ला निर्देश - क्वांटम कम्युनिकेशन प्रयोगशाळेचे उद्घाटनसेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्सच्या (सी-डॉट) अधिकार्‍यांनी दूरसंचार सचिवांकडून आलेल्या निर्देशांनुसार ‘६जी’वर काम करण्याची तयारी सुरू केल्याचे म्हटले आहे. भारतात अजून ५जी सेवा सुरू झालेली नाही. मात्र ‘६जी’वर काम सुरू करून या क्षेत्रात भविष्यात भारत या आघडीवर मागे राहणार नाही. तंत्रज्ञानाच्या शर्यतीतून बाहेर होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी ‘६जी’वर काम सुरू केले आहे. यामध्ये सॅमसंग, एलजी, हुवेईसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. भारताला या शर्यतीत रहायचे असेल, ‘६जी’ तंत्रज्ञानात जगातील मोठ्या कंपन्यांना टक्कर देण्यास भारताला सक्षम बनवायचे असेल तर ६जीवर आतापासून काम सुरू करायला हवे, यादृष्टीने हे निर्देश दूरसंचार सचिवांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येते.‘६जी’ तंत्रज्ञानावर काम सुरू करण्याचे दूरसंचार सचिवांचे ‘सी-डॉट’ला निर्देश - क्वांटम कम्युनिकेशन प्रयोगशाळेचे उद्घाटन

‘५जी’चा डाटा लोडिंग वेग हा २० गीगाबिट प्रतिसेकंदपर्यंत (जीबीपीएस) असू शकतो. मात्र मोबाईल सेवा देणार्‍या कंपन्या किती स्पीड उपलब्ध करून देतात यावर ही बाब अवलंबून असेल. मात्र ‘५जी’पेक्षा ‘६जी’चा वेग हा ५० पट अधिक असणार आहे. ‘५जी’ची स्पेक्ट्रमची क्षमता ‘४जी’पेक्षा तीन पट अधिक आहे. एका अंदाजानुसार ‘६जी’ तंत्रज्ञान २०२८-२०३० सालापर्यंत व्यावसायिक स्तरावर बाजारात येऊ शकते.‘६जी’ तंत्रज्ञानावर काम सुरू करण्याचे दूरसंचार सचिवांचे ‘सी-डॉट’ला निर्देश - क्वांटम कम्युनिकेशन प्रयोगशाळेचे उद्घाटन

दरम्यान, रिलायन्स जीओ, वोडाफोन, एअरटेल सारख्या कंपन्यांकडून देशात ‘५जी’च्या चाचण्या काही महिन्यांपूर्वी घेण्यात आल्या होत्या. अद्याप ‘५जी’ स्पेक्ट्रमचे वाटप झाले नसून सरकार त्याची आधार किंमत लवकरच ठरवेल. यासाठी सूचना सरकारने मागविल्या आहेत. या आधार किंमतीनुसार ५जी सेवेसाठी स्पेक्ट्रम दिले जातील. ही प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

leave a reply