अमेरिकी हवाईदल व ‘डार्पा’कडून हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी

वॉशिंग्टन – अमेरिकेचे हवाईदल व संरक्षण संशोधन संस्था ‘डार्पा’ने हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याचे जाहीर केले. हे हायपरसोनिक क्षेपणास्त्र ‘हायपरसोनिक एअर-ब्रीदिंग वेपन कॉन्सेप्ट’ (एचएडब्ल्यूसी) प्रकारातील आहे. विमानातून सोडण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने ‘मॅक ५’पेक्षा अधिक वेग गाठल्याचा दावा ‘डार्पा’कडून करण्यात आला. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने ‘एचएडब्ल्यूसी’ हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची २०१३ सालानंतरची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी ‘बी-५२ बॉम्बर’मधून करण्यात आलेली चाचणी अपयशी ठरली होती.

अमेरिकी हवाईदल व ‘डार्पा’कडून हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी‘डिफेन्स ऍडव्हान्स्ड् रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी’ने सोमवारी क्षेपणास्त्र चाचणीची माहिती देणारे निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार ‘रेथॉन टेक्नॉलॉजीज्’ या कंपनीने तयार केलेल्या ‘हायपरसोनिक एअर-ब्रीदिंग वेपन कॉन्सेप्ट’ (एचएडब्ल्यूसी) प्रकारातील क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. यासाठी ‘नॉथ्रॉप ग्रुमन’ या कंपनीच्या ‘स्क्रॅमजेट इंजिन’चा वापर करण्यात आला आहे. ‘व्हेईकल इंट्रिगेशन ऍण्ड रिलिज सिक्वेन्स’, ‘सेफ सेपरेशन फ्रॉम लॉंच एअरक्राफ्ट’, ‘बूस्टर इग्निशन ऍण्ड बूस्ट’, ‘बूस्टर सेपरेशन ऍण्ड इंजिन इग्निशन’ व क्रूज या गोष्टींची चाचणी हे मोहिमेचे उद्दिष्ट होते, असे ‘डार्पा’कडून सांगण्यात आले.

अमेरिकी हवाईदल व ‘डार्पा’कडून हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणीअमेरिकेच्या संरक्षणदलांना प्रगत क्षमता असणारी यंत्रणा पुरविणे हे आमचे उद्दिष्ट असून, या चाचणीतून त्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे, असे ‘डार्पा’चे वरिष्ठ अधिकारी अँड्य्रू क्नॉडलर यांनी सांगितले. अमेरिकेच्या संरक्षणविभागाकडून सध्या लष्कर, नौदल, हवाईदल यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या १०हून अधिक हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रकल्पांवर काम सुरू आहे. गेल्या वर्षी लष्कर व नौदलासाठी संयुक्तरित्या विकसित करण्यात येणार्‍या हायपरसोनिक यंत्रणेची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. नोव्हेंवर २०२०मध्ये अमेरिकेने ऑस्ट्रेलियाबरोबर संयुक्तरित्या हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठीही करार केला आहे.

अमेरिकेव्यतिरिक्त रशिया व चीनने हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत आघाडी घेतली आहे. रशियाने आपल्या संरक्षणदलात तीन हायपरसोनिक क्षेपणास्त्रे सामील केल्याचे मानले जाते. चीननेही हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या केल्या असून ती संरक्षणदलात सामील केल्याचे मानले जाते. मात्र त्याला ठोस दुजोरा देण्यात मिळालेला नाही. जपान, भारत, फ्रान्स व जर्मनी हे देशदेखील हायपरसोनिक क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते.

leave a reply