पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानात तोफेचा मारा केला

- अफगाणी संरक्षण मंत्रालयाचा आरोप

काबुल/ओटावा – ‘पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी अफगाणिस्तानात तोफगोळा डागला. यामध्ये अफगाणी स्थानिक जखमी झाला आहे. पाकिस्तानी लष्कराचा हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन ठरते’, असा आरोप अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे उपप्रवक्ते फवाद अमन यांनी केला. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या हवाईदलाने अफगाणिस्तानच्या लष्करावर हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. दरम्यान, पाकिस्तान तालिबानच्या दहशतवाद्यांची अफगाणिस्तानात घुसखोरी घडवित असल्याचा आरोप कॅनडाच्या माजी नेत्याने केला आहे.

पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानात तोफेचा मारा केला - अफगाणी संरक्षण मंत्रालयाचा आरोपअफगाणिस्तानचा ताबा घेण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर तालिबानला सहाय्य करीत असल्याचा आरोप अफगाण यंत्रणा आधीपासून करीत होत्या. गेल्या महिन्यात पाकिस्तानने तालिबानचे १० हजार दहशतवादी आपल्या देशात घुसविल्याचा ठपका अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी दुशांबे येथील बैठकीत केला. त्याचबरोबर तालिबानबरोबरच्या संघर्षात पाकिस्तानचे जवान सहभागी झाल्याचा पर्दाफाश अफगाणी लष्कराने केला. पण रविवारी पाकिस्तानी लष्कराने आमच्या देशात तोफेचा मारा केल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानात तोफेचा मारा केला - अफगाणी संरक्षण मंत्रालयाचा आरोपपाकिस्तानच्या स्वात प्रांतातून अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात ‘डी-३०’ या तोफेतून रॉकेट डागण्यात आल्याचा आरोप अफगाण संरक्षण मंत्रालयाचे उपप्रवक्ते फवाद अमन यांनी केला. शेल्तन जिल्ह्यात कोसळलेल्या या रॉकेट हल्ल्यात स्थानिक जखमी झाल्याचे फवाद यांनी म्हटले आहे. पाकिस्तान हा चांगला शेजारी नाही, हे या हल्ल्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचा ठपका फवाद यांनी ठेवला.

तर कॅनडाचे माजी मंत्री व राजनैतिक अधिकारी ख्रिस अलेक्झांडर यांनी पाकिस्तानवर छुपे युद्ध छेडण्याचा आणि युद्धगुन्ह्यांचा आरोप केला. अलेक्झांडर यांनी रविवारी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानात तोफेचा मारा केला - अफगाणी संरक्षण मंत्रालयाचा आरोपपाकिस्तानच्या सीमेवर प्रतिक्षेत असलेले तालिबानचे दहशतवादी अफगाणिस्तानात घुसखोरी करण्याच्या तयारीत बसल्याचे अलेक्झांडर यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे. हा फोटो पाहिल्यानंतरही पाकिस्तान अफगाणिस्तानविरोधी छुप्या युद्धात गुंतलेला नाही आणि पाकिस्तानवर युद्धगुन्हे लागू होत नाही, असे कुणी म्हणू शकेल का? असा सवाल अलेक्झांडर यांनी केला.

यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली. कॅनडाच्या नेत्यानी दिलली माहिती दिशाभूल करणारी असून याचा आम्ही निषेध करतो, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. यावरही अलेक्झांडर यांनी ताशेरे ओढले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी आणि परराष्ट्र मंत्रालय हेच अफगाणिस्तानच्या शांतता व स्थैर्यासाठी प्रयत्न करणार्‍यांचा अपमान करीत असल्याचा टोला लगावला. अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी अलेक्झांडर यांनी पाकिस्तानवर केलेल्या आरोपांचे समर्थन केले आहे.

leave a reply