अमेरिकेने युक्रेनमध्ये जैविक युद्ध छेडले आहे

-उत्तर कोरियाचा आरोप

korea-kimसेऊल – युक्रेनमध्ये अमेरिकेच्या छुप्या जैविक प्रयोगशाळा असल्याचा आरोप रशियाने याआधी केला होता. या प्रयोगशाळांमध्ये प्लेग, अँथ्रॅक्स, कॉलेरा, ट्युलारेमिया आणि काही इतर विषारी विषाणूंवर संशोधन सुरू असल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला होता. उत्तर कोरियाने देखील रशियाच्या या आरोपांचे समर्थन केले. तसेच अमेरिकेने युक्रेनमध्ये जैविक युद्ध छेडले असून कुठल्याही देशावर आणि कृषी क्षेत्रावर हल्ला चढविण्यासाठी अमेरिका जैविक शस्त्रास्त्रांची निर्मिती करीत असल्याचा ठपका उत्तर कोरियाने ठेवला आहे.

24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील भागावर हल्ले सुरू केले. यानंतर अमेरिकेने युक्रेनमधील आपल्या प्रयोगशाळांमधील कागदपत्रे नष्ट करुन जैविक शस्त्रास्त्र निर्मितीचे पुरावे नाहिसे करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला होता. तसेच या प्रयोगशाळांमधील काही कागदपत्रे आपल्या हाती लागल्याची घोषणा रशियाने केली होती. सुरुवातीला रशिया करीत असलेले आरोप पेंटॅगॉनने फेटाळले होते. मात्र गेल्या आठवड्यात पेंटॅगॉनने प्रसिद्ध केलेल्या ‘फॅक्ट शीट ऑन डब्ल्यूएमडी थ्रेट रिडक्शन एफर्ट्‌‍स’ अहवालात युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांची कबुली दिली.

ukraine-us-bio-labयुक्रेनमध्ये अमेरिकेच्या 46 जैविक प्रयोगशाळा असून गेल्या दोन दशकांपासून अमेरिकेच्या निधीवर या प्रयोगशाळांमध्ये काम सुरू असल्याचे पेंटॅगॉनने स्पष्ट केले. या प्रयोगशाळांद्वारे युक्रेनची जैवसुरक्षा मजबूत करणे तसेच मनुष्य आणि प्राण्यांमधील रोगावर निरिक्षण ठेवणे सोपे होते’, असा दावा पेंटॅगॉनने केला होता. यामुळे भडकलेल्या रशियाने ‘युक्रेनमधील प्रयोगशाळांचा वापर शांतीसाठी किंवा वैज्ञानिक उद्दिष्टांसाठी सुरू होता, याबाबत आम्हाला खुलासा नको. तर रशियाच्या सीमेजवळ या प्रयोगशाळांची उभारणी का झाली याचा जाब रशियाने विचारला होता.

पण उत्तर कोरियाने या आरोपांमध्ये भर टाकून अमेरिका युक्रेनमध्ये जैविक शस्त्रास्त्रांची निर्मिती करीत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने 20 कोटी डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करून या प्रयोगशाळांमध्ये कुठल्याही देशावर आणि कृषी क्षेत्रावर हल्ला चढविणाऱ्या शस्त्रास्त्रांची निर्मिती केल्याचा दावा उत्तर कोरियाने केला. आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून अमेरिकेने युक्रेनसह जगभरात जैविक प्रयोगशाळा सुरू केल्याचे उत्तर कोरियाचे म्हणणे आहे.

leave a reply