… तर ट्रम्प आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असते

- अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम

वॉशिंग्टन – ‘वुहान लॅब लीक’चे पुरावे वर्षभरापूर्वी समोर आले असते तर अमेरिकेतील निवडणुकीचा निकाल वेगळा दिसला असता. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले असते, असे अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी म्हटले आहे. तसेच अमेरिकेच्या 27 संशोधकांनी खोटा व राजकीय हेतूने प्रेरित असलेला अहवाल तयार केल्यामुळे वुहान लॅब लीकचे सत्य वेळीच समोर आले नाही, अशी टीका ग्रॅहम यांनी केली.

... तर ट्रम्प आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असते - अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहमचीनच्या ‘वुहान इन्स्टीट्युट ऑफ व्हायरॉलॉजी’शी निगडीत असलेल्या संशोधकांनी बनावट अहवाल तयार केला आणि कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेत तयार झालेला नाही, असे जाहीर केले. आज हे संशोधक आपली प्रतिष्ठा वाचविण्यासाठी धडपडत आहेत, अशा शब्दात गॅ्रहम यांनी या संशोधकांना फटकारले. ‘फॉक्स न्यूज’ या अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लिंडसे ग्राहम बोलत होते. कोरोनाच्या साथीचे फार मोठे राजकीय परिणाम अमेरिकेत झाले, असा दावा यावेळी सिनेटर ग्राहम यांनी केला.

कोरोनाचा चायनिज व्हायरस किंवा वुहान व्हायरस असा उल्लेख करणार्‍या तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे दावे त्यावेळी अमेरिकी संशोधकांनी नाकारले होते. त्याचा फार मोठा राजकीय फटका ट्रम्प यांना बसला. आता चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच कोरोनाची निर्मिती झाल्याचे दावे समोर येत आहेत. याला दुजोरा देणारे पुरावे असल्याचे दावेही काही संशोधकांनी केले आहेत. ही ‘वुहान लॅब लीक’ची माहिती वर्षभरापूर्वी उघड झाली असती, तर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले असते. कारण यामुळे ट्रम्प यांची अमेरिकेतील प्रतिमा पूर्णपणे बदलून गेली असती, असा दावा लिंडसे ग्रॅहम यांनी केला. चायना व्हायरस जाणीवपूर्वक पसरविण्यात आला आहे व त्यासाठी चीनला जबाबदार कोण धरू शकते, ट्रम्प की बायडेन हा मुद्दा त्यावेळी निवडणुकीत उपस्थित झाला असता. गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यातच ट्रम्प कोरोनाबाबत खरे बोलत आहेत, हे सिद्ध झाले असते, तर आज डोनाल्ड ट्रम्पच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर दिसले असते, असे ग्रॅहम म्हणाले.... तर ट्रम्प आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असते - अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम

कोरोनाच्या साथीने अमेरिकेत सहा लाख जणांचा बळी घेतला. राष्ट्राध्यक्ष या नात्याने ही साथ रोखण्यात ट्रम्प व त्यांचे प्रशासन अपयशी ठरले, असा प्रचार विरोधी पक्षनेत्यांनी केला. त्याचा फार मोठा प्रभाव अमेरिकन मतदारांवर पडला होता. काहीजण तर कोरोनाचा अमेरिकेतील फैलाव म्हणजे त्यांच्याविरोधातील राजकीय कारस्थानाचा भाग होता, असा आरोप करीत होते. या पार्श्‍वभूमीवर सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी दिलेली ही मुलाखत अतिशय महत्त्वाची ठरते. मुख्य म्हणजे सोशल मीडियावर अमेरिकेत फेरनिवडणूक घेण्याची मागणी काहीजणांकडून केली जात आहे. ट्रम्प यांच्याविरोधात कट करून राष्ट्राध्यक्षपदावरून खाली खेचण्यात आल्याचा दावा करून ही फेरनिवडणुकीची मागणी केली जात आहे.

leave a reply