इस्रायलच्या ‘ब्ल्यु फ्लॅग’ सरावाला युएईच्या हवाईदल प्रमुखांची भेट

- इराणला संदेश दिल्याचा माध्यमांचा दावा

‘ब्ल्यु फ्लॅग’ओव्दा – इस्रायलमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ‘ब्ल्यु फ्लॅग’ हवाईसराव सुरू आहे. इस्रायल व सात मित्रदेशांच्या हवाईदलांमध्ये आठवडाभर चालणार्‍या या सरावाला युएईचे हवाईदलप्रमुख वाईस मार्शल इब्राहिम नासिर मोहम्मद अल-अलावी यांनी भेट दिली. युएईच्या हवाईदलप्रमुखांची हवाईसरावातील ही उपस्थिती विशेष महत्त्वाची ठरते, अशी प्रतिक्रिया इस्रायलने दिली. याद्वारे इस्रायल व युएई, इराणला इशारा देत आहेत, असा दावा आखाती माध्यमांनी केला आहे.

दर दोन वर्षांनी इस्रायलच्या ओव्दा हवाईतळावर आयोजित केला जाणारा ‘ब्ल्यु फ्लॅग’ हा बहुराष्ट्रीय हवाईसराव दोन दिवसांपूर्वी सुरू झाला. यंदाच्या या सरावात भारत, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, इटली या देशांच्या सुमारे ७० लढाऊ विमानांनी तर १,५०० हून अधिक अधिकार्‍यांनी सहभाग घेतला आहे. या सरावात अतिप्रगत एफ-३५, रफायल, एफ-१६, मिराज २००० या लढाऊ विमाने सहभागी झाली आहेत.

इस्रायलमध्ये आयोजित या हवाईसरावाच्या निमित्ताने युएईचे हवाईदलप्रमुख वाईस मार्शल अलावी यांना नुकतीच ओव्दा हवाईतळाला भेट दिली. यावेळी इस्रायलचे हवाईदलप्रमुख मेजर जनरल अमिकम नॉर्कीन यांच्यासह युएईच्या हवाईदलप्रमुखांनी सदर सरावाची पाहणी केली. इस्रायली हवाईदलाच्या ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख अमिर लझार यांनी याची माहिती जाहीर केली.

यंदाच्या ब्ल्यु फ्लॅग सरावात युएईच्या विमानांनी सहभाग घेतलेला नसला तरी वाईस मार्शल अलावी यांची ही भेट विशेष महत्त्वाची असल्याचे लझार यांनी सांगितले. गेल्या वर्षी इस्रायल व युएई तसेच इतर अरब देशांमध्ये पार पडलेल्या अब्राहम करारानंतर विविध संधी खुल्या झाल्या आहेत, असे लझार म्हणाले. त्याचबरोबर पुढच्या काळात इस्रायलच्या या हवाईसरावात युएईची लढाऊ विमानेही सहभागी होतील, अशी अपेक्षा लझार यांनी व्यक्त केली.

इराण ड्रोन्सची आर्मी उभारण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करून लझार यांनी सदर सरावाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘एखाद्या दिवशी या सरावात सहभागी झालेल्या देशांना इराणच्या धोक्याविरोधात एकजुटीने कारवाई करावी लागू शकते’, असे सांगून हा सराव त्याची उत्तम पूर्वतयारीचा भाग असल्याचे संकेत लझार यांनी यावेळी दिला. इस्रायलला आहे, त्याहूनही कितीतरी अधिक पटींनी अरब आखाती देशांना इराणपासून धोका संभवतो, असे इस्रायलचे नेते बजावत आहेत. या विरोधात इस्रायल व अरब देशांचे सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरते, असे सांगून इस्रायलने अब्राहम करारासाठी पुढाकार घेतला होता.

या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलच्या हवाई सरावातील युएईच्या हवाईदलप्रमुखांची उपस्थिती ही लक्षणीय बाब ठरते. आखाती क्षेत्रातील माध्यमांनी याची दखल घेतली आहे. आपल्या राजनैतिक सूत्रांचा हवाला देऊन आखाती क्षेत्रातील वृत्तसंस्थांनी पुढच्या काळात इस्रायल व युएईची लढाऊ विमाने संयुक्त सराव करताना दिसतील, असे दावे केले आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी इस्रायलने आखाती देशांबरोबरील संबंध प्रस्थापित करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेला फार मोठ यश मिळत असल्याची बाब यामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे.

तेल अविव, दि. २८ (वृत्तसंस्था) – इस्रायलचे खाजगी प्रवास विमान दोन दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या रियाध विमानतळावर उतरले. इस्रायलच्या आघाडीच्या वृत्तसंस्थेने याची बातमी दिली. इस्रायल व सौदीमध्ये प्रवासी विमानाबाबत अशा स्वरुपायचे हे पहिलेच सहकार्य असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.
सोमवारी सौदी अरेबियाचे प्रवासी विमान इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर उतरल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सौदीतील काही माध्यमांनी सदर वृत्त फेटाळले होते. पण पुढच्या काही तासात इस्रायलचे खाजगी प्रवासी विमान रियाधमध्ये उतरल्याचा दावा इस्रायली वृत्तसंस्थेने केला. ही एक ऐतिहासिक घटना असल्याचे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे.
काही आठवड्यांपूर्वीच सौदी अरेबियाने हवाईहद्द खुली केल्यानंतर, इस्रायल व युएईमध्ये थेट हवाईसेवा सुरू झाली होती. सौदीची ही भूमिका इस्रायलच्या प्रवासी विमान सेवेसाठी फायद्याची असल्याचे दावे इस्रायली माध्यमांनी केले होते.

इस्रायलचे प्रवासी विमान सौदी अरेबियामध्ये उतरले

तेल अविव – इस्रायलचे खाजगी प्रवास विमान दोन दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या रियाध विमानतळावर उतरले. इस्रायलच्या आघाडीच्या वृत्तसंस्थेने याची बातमी दिली. इस्रायल व सौदीमध्ये प्रवासी विमानाबाबत अशा स्वरुपायचे हे पहिलेच सहकार्य असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

सोमवारी सौदी अरेबियाचे प्रवासी विमान इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर उतरल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सौदीतील काही माध्यमांनी सदर वृत्त फेटाळले होते. पण पुढच्या काही तासात इस्रायलचे खाजगी प्रवासी विमान रियाधमध्ये उतरल्याचा दावा इस्रायली वृत्तसंस्थेने केला. ही एक ऐतिहासिक घटना असल्याचे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे.

काही आठवड्यांपूर्वीच सौदी अरेबियाने हवाईहद्द खुली केल्यानंतर, इस्रायल व युएईमध्ये थेट हवाईसेवा सुरू झाली होती. सौदीची ही भूमिका इस्रायलच्या प्रवासी विमान सेवेसाठी फायद्याची असल्याचे दावे इस्रायली माध्यमांनी केले होते.

leave a reply